जीवघेणा खेळ कधी थांबणार?

By Admin | Updated: October 31, 2014 00:50 IST2014-10-31T00:50:29+5:302014-10-31T00:50:29+5:30

मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी जीवघेण्या ठरत आहेत. २०१३ मध्ये देशात ९१०० जणांचा मृत्यू, तर २९ हजार ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. याची दखल घेत शासनाने केंद्रीय मोटार

When will the fatal game stop? | जीवघेणा खेळ कधी थांबणार?

जीवघेणा खेळ कधी थांबणार?

ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी धोकादायक : देशात ९१०० जणांचा मृत्यू
सुमेध वाघमारे - नागपूर
मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी जीवघेण्या ठरत आहेत. २०१३ मध्ये देशात ९१०० जणांचा मृत्यू, तर २९ हजार ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. याची दखल घेत शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल करीत, सळाखी बाहेर आलेल्या ट्रक्सवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतानाही प्रादेशिक परिवहन कार्यालयासह (आरटीओ) चौकाचौकात उभे असलेले वाहतूक पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांपासून ते सीमेरेषेवर सर्वत्र नवी गृहसंकुले (रेसिडेन्शियल अपार्टमेंटस) उभे राहात आहेत. यांना लागणाऱ्या विशेषत: लोखंडी सळाखीचा व्यवसायाने चांगलाचा जोर पकडला आहे. याचा बाजार इतवारीसह, घाटरोड, कमालचौक, मानेवाडा रोड आदी परिसरात व्यापलेला आहे. ही सर्वच ठिकाणे गर्दीच्या ठिकाणी आहेत. येथूनच या सळाखी बांधकाम ठिकाणी जातात. परंतु अनेक जण पैसे वाचविण्यासाठी आवश्यक वाहनांचा उपयोग करीत नाही.
विशेषत: छोट्या वाहनांचा वापर करताना अधिक दिसून येतात. ट्रकमधूनही सळाखी घेऊन जात असताना तीन ते पाच फूट सळाखी बाहेर आलेल्या असतात. काही वाहनांतून तर सळाखी रस्त्यावर घासत वाहून नेतात. वाहनातून बाहेर आलेल्या या सळाखींना अनेक जण फडके बांधून मोकळे होतात. मात्र, यामुळे या प्रकारांमुळे अपघाताचा मोठा धोका संभावतो. शहरात अशा अपघाताच्या संख्येची नोंद नसली तरी भारतात दरवर्षी आठ हजारांच्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती आहे.
पूर्वी ट्रकवर एक मीटरपर्यंत लोखंडी सळाखी वाहून नेण्याची परवानगी होती. मात्र वाहनचालक एक मीटरपेक्षा अधिक सळाखी ट्रकमध्ये वाहून नेत असल्याच्या तक्रारी वाढल्याने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियम ९३ मधील पोटनियम (८) मध्ये बदल करण्यात आले. आता नव्या नियमानुसार ट्रकबाहेर एक इंचही सळाखी दिसल्यास ट्रकचालकांविरु द्ध कठोर कारवाई करण्याचे, वेळ पडल्यास ट्रक जप्त करण्याचे आदेश आहेत, परंतु शहराच्या रस्त्यांवर भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनातून बाहेर निघालल्या सळाखी सहज दिसून येतात.

Web Title: When will the fatal game stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.