शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम कधी मिळणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 01:13 IST

आता राष्ट्रपती राजवटीत तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली गेली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या बाजूने भांडण्यासाठी सद्य:स्थितीत कोणीही नसल्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप आहे.

- सुरेश लोखंडेयंदा प्रारंभी पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी कासावीस झाला होता. मात्र, जूनअखेरपासून सुरू झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला. पेरण्यांसह लागवड उत्तम झाली. खरीप हंगामास संजीवनी देणारा पाऊस जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र कोपला. अतिवृष्टी आणि महापुराने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ठाणे, पालघर जिल्ह्यांवर आपत्ती आली. तेव्हापासून आजपर्यंत निसर्गाने शेतकऱ्यांची केवळ सत्त्वपरीक्षा घेतली आहे. आता राष्ट्रपती राजवटीत तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली गेली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या बाजूने भांडण्यासाठी सद्य:स्थितीत कोणीही नसल्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप आहे.जिल्ह्यात आॅक्टोबर-नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने ४२ हजार ४२६ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. यामध्ये भातासह नागली, वरी आदी पिकांचा हाताशी आलेला खरीप हंगाम हिसकावून नेला. यंदा जिल्ह्यात १४६.६० टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात प्रथम २६ व २७ जुलै आणि ४ ते ६ आॅगस्टला अतिवृष्टी व पुराच्या नैसर्गिक संकटाने जिल्हा बुडाला. यात जिल्ह्यातील ३९८ गावे बाधित झाली. त्यात कल्याण तालुक्यातील २६ हजार १७६ रहिवाशांसह सरकारी जागेवरील तीन हजार ४०४ बाधित कुटुंबीयांचा समावेश होता. तसेच १७ हजार १४३ शेतकºयांच्या सहा हजार ८५५ हेक्टर शेतजमिनीवरील पीक नष्ट झाले.लोकप्रतिनिधी मात्र सत्ता स्थापनेची राजकीय गणिते जुळवण्यात व्यस्त असतानाच राष्टÑपती राजवट लागली. आज त्याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अवकाळी पावसाच्या ४२ हजार हेक्टरपोटी ३३ कोटी ९४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, आठ कोटी रुपयांवर बोळवण केल्याच्या वृत्ताने ७७ हजार शेतकºयांमध्ये संताप आहे. केवळ दोन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकºयांना अवघे १६ हजार रुपये नुकसानभरपाई लागू झाली. हेक्टरी आठ हजार रुपये देऊन शेतकºयांची घोर निराशा केली आहे. पण, जिल्ह्यातील शेतकºयांकडे दोन हेक्टरच्या आतच शेती असल्यामुळे सर्व शेतकरी या नुकसानभरपाईस पात्र असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी सांगितले. तातडीची मदत म्हणून सध्या आठ कोटी २१ लाखांचा नुकसानभरपाईचा पहिला हप्ता तत्काळ दिल्याचेही माने यांनी सांगितले. उर्वरित भरपाई शेतकºयांना मिळणार असल्याचे स्पष्ट केले.खरीप हंगामाच्या नुकसानीची भर काढण्यासाठी रब्बी पीक घेण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन दिले जात आहे. १६ हजार हेक्टरवर रब्बीचे पीक घेण्याची तयारी झाली आहे. यासाठी एक हजार १०० क्विंटल हरभºयाचे बियाणे शेतकºयांना मोफत वाटप सुरू आहे. जनावरांच्या चाºयासाठी १३ हजार किलो मक्याचे बियाणे दिले जात आहे. जिल्ह्यात ७५० एकरवर भाजीपाला घेण्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले आहे. खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई रब्बी हंगामातून करण्याचे प्रयत्न कृषी विभाग करीत आहे. पण, या खरिपाच्या नुकसानीवरील उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ११ हजार शेतकºयांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतला. बँकेच्या माध्यमातून ६० लाख १४ हजार ७३९ रुपये भरून सात हजार ६६३ हेक्टरवरील खरिपाच्या भात व नागली पिकाचा विमा शेतकºयांनी घेतला. त्याद्वारे शेतकºयांना ३० कोटी सात लाख ६३ हजार रुपयांची सुरक्षा मिळण्याची अपेक्षा आहे. पण, त्यावर मात्र प्रशासनाकडून ‘ब्र’ही काढला जात नाही.शेतकºयांनी ३१ जुलै या शेवटच्या दिवसापर्यंत सात हजार ६६३ हेक्टरवरील भात व नागलीच्या पिकांचा विमा उतरवला आहे. यात जिल्ह्यातील कर्जदार सुमारे १० हजार ७४४ शेतकºयांसह ३६० कर्जदार नसलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. बँकांच्या माध्यमातून या ११ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी सात हजार ५६२ हेक्टरवरील पिकासाठी विमा घेतला आहे. ६० लाख १४ हजारांपेक्षा अधिक रक्कम भरली आहे. यातून शेतकºयांना ३० कोटींपेक्षा अधिक रकमेचे सुरक्षाकवच असल्याचे सांगितलेले आहे. याप्रमाणेच सीएससीच्या ३०० शेतकºयांच्या १०१ हेक्टरवरील पिकाकरिता ८७ हजार २५८ रुपये भरून ४३ लाख ६२ हजार ९२३ रुपयांची पीकसुरक्षा मिळणे अपेक्षित आहे. पण, या पीकविमा लाभाच्या बाबतीत मात्र काहीही चर्चा होत नसल्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप आहे.शहापूर तालुक्यातील शेतकºयांवर दरवर्षी अस्मानी संकटे येत असली तरी या वर्षीचे पावसाळी संकट भयावह आहे. यंदा गेली साडेसात महिने कधी नव्हे इतका पाऊस पडल्याने शेतकरी पूर्णपणे संपला आहे. मागील वर्षी भातपिके ऐन उमेदीच्या भरात असतानाच पावसाने उघडीप दिल्याने भातपिके करपली आणि शेतकºयांचे बरेच नुकसान झाले. यावर्षी समोर दिसणाºया सोन्यासारख्या दाण्याला घरात आणता आले नाही. उलट तो शेतातील पाण्यात गळून पडला. दीड एकर क्षेत्रात भातपिकाची लागवड केली. आज संपूर्ण भात पाण्यात गेल्याने खाण्यासाठी या वर्षी सुपीक तांदूळ राहिला नाही. कुटुंबाची धान्यावाचून परवड झाली आहे. यावर्षी तरी सरकार भरीव मदत करील, अशी अपेक्षा होती, मात्र राज्यपालांनी जाहीर केलेली मदत आमच्या कुटुंबासाठी अतिशय तोकडी आहे. ३५ हजार रुपयांचे धान्य पाण्यात गेल्यानंतर आठ हजार रुपयांची मदत तीही हेक्टरी, ही चेष्टा असून आता आम्ही कसे जगायचे, ते तुम्हीच सांगा.- गणपत मुकुंद पारधी, माणगाव

 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र