‘रक्षा संपदा’ अपडेट कधी होणार ?

By Admin | Updated: July 10, 2017 01:30 IST2017-07-10T01:30:56+5:302017-07-10T01:30:56+5:30

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचलनालयाच्या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची बहुतांश माहिती चुकीची

When will 'defense assets' update? | ‘रक्षा संपदा’ अपडेट कधी होणार ?

‘रक्षा संपदा’ अपडेट कधी होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचलनालयाच्या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची बहुतांश माहिती चुकीची असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तीन महिन्यांपूर्वी बदली झालेले अध्यक्ष, अडीच महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका यांची छायाचित्रांसह नावे अद्यापही झळकताना दिसत आहेत. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाची व शाळांची माहिती दोन वषार्पांसून बदलली नसल्याने संबंधित संकेतस्थळ अपडेट होत नसल्याने देहूरोड बोर्डाची माहिती पाहताना संभ्रम होत आहे. बोर्डाचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका नक्की कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: When will 'defense assets' update?