शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

आता नाट्य संमेलनाचे ‘बिगुल’ कधी वाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 07:00 IST

शंभरावे नाट़्य संमेलन मुंबईला होणार..?

ठळक मुद्देसंमेलनाच्या आयोजनासाठी किमान दोन ते महिन्याचा कालावधी लागणार अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी  एप्रिल-मे महिनाच उजाडणार

पुणे : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  ‘सूप’ वाजले. आता शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ‘बिगुल’ कधी वाजणार? असा प्रश्न नाट्यवर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे. संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी अद्यापही संमेलनाचे स्थळ आणि तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. आता नवीन सरकार देखील अस्तित्वात आले आहे. मग घोडं नक्की अडलंय कुठं ? इतका विलंब का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी साहित्य संमेलनानंतर रसिकांना नाट्य संमेलनाचे वेध लागतात.  जानेवारीमध्ये साहित्य संंमेलन झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात नाट्य संमेलनाचे  ‘बिगुल’ वाजते. मात्र जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होणा-या नाट्य संमेलनाला एप्रिल किंवा जूनमधला मूहुर्त लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. 97 वे नाट्य संमेलन उस्मानाबादला एप्रिलमध्ये म्हणजे ऐन उन्हाळाच्या हंगामात झाले तर 98 वे नाट्य संमेलन हे मुलुंड मध्ये पावसाळ्याच्या दिवसात जूनमध्ये रंगले. गतवर्षी नागपूर येथे ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली 99 वे नाट्य संमेलन पार पडले. हे संमेलन जरी अपवाद ठरले असले तरी यंदाच्या वर्षी पुन्हा नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी एप्रिल किंवा त्यानंतरचाच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. कारण शंभराव्या नाट्य संमेलनाच्या तारखा आणि स्थळचं अद्याप घोषित झालेले नाही. 2019 मध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका नाट्य संंमेलनाला बसला. राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उस्मानाबाद शाखेने अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे स्थळ आणि तारखा निश्चित करून सरकारकडून संंमेलनासाठीचे 50 लाख रूपयांचे अनुदान पदरात पाडून घेतले. मात्र ही तत्परता मध्यवर्ती नाट्य परिषदेला दाखविता आली नव्हती.  स्थळ आणि तारखाच जाहीर झाल्या नसल्याने सरकारकडे अनुदानाचा प्रस्तावच पाठवता आला नाही. या सर्व घडामोडी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्येच होणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे  सत्ता स्थापनेचे घोंगडे भिजत पडले. त्यामुळे नाट्य संंमेलनाच्या आयोजनासाठी पैसा आणायचा कुठून?मग संमेलन कुणाच्या जीवावर करणार? अशी परिषदेची गोची झाली.  दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रीमंडळ कार्यान्वित झाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीपदाची धुरा युवा नेते अमित देशमुख यांच्याकडे आली आहे. मात्र जोपर्यंत स्थळ आणि तारखा निश्चित केल्या जात नाहीत तोवर 50 लाख रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवता येणार नाही.  यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने तात्काळ पावले उचलली तरी संमेलनाच्या आयोजनासाठी किमान दोन ते महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदाही  अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी  एप्रिल-मे महिनाच उजाडणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. -------------------------------------------------------------------डिसेंबर महिन्यात झालेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत शंभरावे नाट्य संमेलन मुंबईला द्यावे आणि 101 वे संमेलन हे पुण्याला घेण्यात यावे. तसेच त्यावर्षीच्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मोहन जोशी यांना देण्यात यावे असे ठरले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत येत्या 22 जानेवारीला चित्र पुरेसे स्पष्ट होईल. 

..............................

’ शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तारखा आणि स्थळ घोषित करण्यासाठी येत्या 22 जानेवारीला सर्वसाधारण सभा आणि कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे- मंगेश कदम, प्रवक्ता, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकartकला