दलितांवरील अत्याचार कधी थांबणार?

By Admin | Updated: October 31, 2014 01:45 IST2014-10-31T01:45:25+5:302014-10-31T01:45:25+5:30

अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावामध्ये झालेल्या जाधव कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांडानंतर राज्यभरात सलग चार दलित अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत.

When will the atrocities against Dalits be stopped? | दलितांवरील अत्याचार कधी थांबणार?

दलितांवरील अत्याचार कधी थांबणार?

सलग चार घटना : शपथविधीदरम्यान दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे धरणो आंदोलन
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावामध्ये झालेल्या जाधव कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांडानंतर राज्यभरात सलग चार दलित अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी दलित अत्याचारविरोधी कृती समितीने उद्या (शुक्रवारी) होणा:या शपथविधीदरम्यान धरणो आंदोलनाची हाक दिली आहे. राजकीय दबावामुळे पोलीस या प्रकरणांचा योग्य तपास करीत नसल्याचा आरोपही कृती समितीने गुरुवारी  केला आहे.
या वेळी कृती समितीच्या निमंत्रक ऊर्मिला पवार म्हणाल्या, ‘राज्यातील अहमदनगर, बीड आणि जालना या ठिकाणी दलितांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील अहमदनगर जिल्ह्यात 2क्12 साली 44, 2क्13मध्ये 111 आणि 2क्14मध्ये ऑक्टोबर्पयत सुमारे 79 दलित अत्याचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. त्याचा तपास करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि पत्रकारांची एक सत्यशोधक समिती घटनास्थळी गेली होती. त्यात प्रामुख्याने दलित अत्याचारांच्या घटनांत राजकीय दबावापोटी पोलीस यंत्रणा योग्य तपास करीत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.’
पाथर्डी येथील घटना ही नियोजनबद्ध कट रचून घडवल्याचे कृती समितीचे उत्तम जहागीरदार यांनी सांगितले. जहागीरदार म्हणाले, ‘खैरलांजीपाठोपाठ पाथर्डी हे गावही तंटामुक्त गाव होते. तंटामुक्त गावातील भांडणामध्ये फिर्यादींना पोलीस ठाण्यार्पयत पोहोचूच दिले जात नाही.’ परिणामी, महात्मा गांधी तंटामुक्ती सरकारी अभियानामार्फत जातीयवादी गुंडांचे समर्थन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
राज्यातील दलित अत्याचारांचा घटनाक्रम
2क् ऑक्टोबर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे संजय, जयश्री (पत्नी) आणि सुनील (मुलगा) या जाधव कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाली.
21 ऑक्टोबर : परळी येथील बौद्ध युवक सुनील रोडे याच्यावर धारदार शस्त्रने वार करून हत्या करण्यात आली.
 
21 ऑक्टोबर : पारनेर येथील पारधी समाजातील दोघांची हत्या करण्यात आली.
21 ऑक्टोबर : बीड येथील भीमनगर बौद्ध वस्तीवर निकाळजे परिवारावर हल्ला करून तिघांना जखमी केले.
21 ऑक्टोबर : पाटोदा तालुक्यातील 
मातंग वस्तीवर झालेल्या दगडफेक 
आणि जबर मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले.
 
रिपाइंची आर्थिक 
मदत कधी मिळणार?
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाथर्डी येथील पीडित जाधव कुटुंबाची भेट घेऊन 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मात्र ही मदत अद्याप त्या कुटुंबाला मिळालेली नाही, असा दावा जहागीरदार यांनी केला. 

 

Web Title: When will the atrocities against Dalits be stopped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.