शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

"शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे...; जेव्हा 'ते' सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं वादळ निर्माण होणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:50 IST

शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आतच तुम्हाला कळेल, असे शिवसेना (ES) नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे...

महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये. महाविकास आघाडीने एकमेकांना पाडण्याचे जे काम केले आहे, त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. म्हणून आता ना नाना पटोले त्यांना भेटणार, ना उद्धव ठाकरे त्यांना भेटणार, कुणीही कुणाला भेटणार नाही. वेगवेगळ्या चेहऱ्यांकडे त्यांच्या माना झालेल्या आहेत आणि शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आतच तुम्हाला कळेल, असे शिवसेना (ES) नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ते नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते.

शरद पवार काय निर्णय घेतील ते सांगता येत नाही, शरद पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात का? असा प्रश्न केला असता, शिरसाट म्हणाले, "शरद पवार आहेत ते. तुम्हाला कुठे दिसतायत? सुप्रियाताई बोलताना दिसत आहेत का? त्यांचे कुणी आणखी प्रवक्ते बोलताना दिसतायत? याचे अर्थ समजून घ्या, जेव्हा ते सर्व शांत असतात तेव्हा समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे." यावर, वादळाचा अर्थ काय? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, "वादळाचा काही अर्थ नसतो, वादळ हे कुणालाही उद्ध्वस्त करत असतं," असेही शिरसाट म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे भेटीवर काय म्हणाले? -फडणवीस-ठाकरे भेटीसंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आनंदाची गोष्ट आहे, संस्कृती आहे. निवडणुकीच्या काळात काय बोलले होते, हे आठवलं असे तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की, आपण चुकीचं बोललो. मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी केली नसावी, असे मला वाटते. यावर, काही दिवसांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्यावर बरेच आरोप केले होते? असे विचारले असता शिरसाट म्हणाले, "त्या आरोपांची जाणीव त्यांना झाली ना. आरोप करून काय निष्पन्न झाले? तर आमदार कमी झाले आहेत. २० वर आले. भविष्यात काय होईल याचा तुम्हाला अंदाज येतोच आहे. 

...ते सर्व आमदार आमच्या संपर्कात -यावर, आजून आमदार कमी होतील का? असा प्रश्न केला असता, शिरसाटांनी मोठा गौप्य स्फोट केला, "कमी होतील म्हणजे ते तेथे राहायला हवेत ना? ते सर्व (UBT चे आमदार) आता आमच्या संपर्कात आहेत. पाहू, कधी निर्णय घ्यायचा, तसा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील," असे शिरसाट म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी