शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Maharashtra winter session 2021 : शिवस्मारक कधी? सभागृहात पडसाद; न्यायालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 09:45 IST

Ashok Chavan : शिवस्मारकाच्या बांधकामाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोपही विरोधकांनी केला. 

मुंबई : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, ही सर्वांचीच भूमिका आहे. शिवस्मारकाबाबतच्या तीन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून, यावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. न्यायालयाकडून सगळ्या मंजुरी मिळाल्यानंतर हे स्मारक कमीत कमी वेळात पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले. 

प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे बांधकाम कोणतीही मुदतवाढ न देता तातडीने सुरू करावे, अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना भाजपचे विनायक मेटे यांनी सोमवारी मांडली. हे स्मारक किती कालावधीत पूर्ण करणार आणि राज्य सरकारचे यासाठीचे नियोजन काय, असे प्रश्न विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केले. शिवस्मारकाच्या बांधकामाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोपही विरोधकांनी केला. 

यावर मंत्री चव्हाण म्हणाले की, कोरोना काळात न्यायालयाच्या प्रक्रिया मंदावल्या आणि कामेही थंडावली होती. काही मुद्दे न्यायालयाशी संबंधित असून, नऊ विभागांशी संबंधित असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयापलीकडे राज्य सरकार जाऊ शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कंत्राटदाराला एक वर्ष मुदतवाढ

- शिवस्मारक बांधकामासाठी तत्कालीन सरकारने मे. एल अँड टी लिमिटेड कंपनी या कंत्राटदाराला दिलेली तीन वर्षांची मुदत ऑक्टोबरमध्ये संपली. कंपनीला आजतागायत कोणत्याही प्रकारची रक्कम अदा करण्यात आली नाही.  - कंपनीसोबत मुदतवाढ न देता करार रद्द केले असते तर मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी लागली असती. त्यामुळे कोणत्याही अतिरिक्त खर्चाची तरतूद न करता या कंत्राटाला एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे स्मारक तातडीने पूर्ण व्हावे, अशीच सरकारची भूमिका आहे, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणvidhan sabhaविधानसभाShiv Smarakशिवस्मारक