शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची दिवाळी सुट्टी कधीपासून? पालक आणि शिक्षकही गोंधळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 07:00 IST

School Diwali Holiday : स्वतः शिक्षणमंत्र्यांनीच नवीन सुट्ट्यांच्या तारखांचे ट्विट केल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक तसेच मुख्याध्यापकांसह पालकांचा एकच गोंधळ उडाला आहे.

मुंबई : लॉकडाऊननंतर तब्बल दीड वर्षांनी सुरू झालेल्या शाळांनी शिक्षण निरीक्षकांनी, शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या आणि आता २ दिवसांतच सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून नवीन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. स्वतः शिक्षणमंत्र्यांनीच नवीन सुट्ट्यांच्या तारखांचे ट्विट केल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक तसेच मुख्याध्यापकांसह पालकांचा एकच गोंधळ उडाला आहे.

शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे १ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सुट्या गृहीत धराव्या की, आता शिक्षण सहसचिवांनी काढलेल्या पत्रकाप्रमाणे, शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या ट्विटप्रमाणे २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर हा सुट्टीचा कालावधी गृहीत धरावा, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन व शिक्षक, मुख्याध्यापक यांना पडला आहे.

पहिल्यांदा २० दिवसांची जाहीर झालेली सुट्टी शालेय शिक्षण विभागाने १४ दिवसांपर्यंत कमी केली आहे. सुट्टी कमी झाल्याने पालक व शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन बिघडल्याने मुख्याध्यापक वर्गातूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.               

परीक्षांचे काय करावे?उरलेल्या दिवसांतील परीक्षांचे काय करायचे?, काही ठिकाणी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ, चाचण्यांसाठी वेळ दिला आहे, त्यात शाळा बंद ठेवायच्या का?, असे प्रश्न मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी उपस्थित केले आहेत.

टॅग्स :SchoolशाळाDiwaliदिवाळी 2021