शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलमधून जेव्हा पाण्याऐवजी चक्क पेट्रोल येतं.... ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 19:56 IST

एकीकडे पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वच स्तरातुन संतापाची लाट उसळली असताना पिंपरी चिंचवडमधील डुडुळगावात चक्क बोअरवेलला पेट्रोल येऊ लागले ही घटना थोड्या वेळासाठी का होईना नागरिकांना सुखद देणारी ठरली. 

ठळक मुद्देडुडूळगावच्या अजब घटनेने सुखद धक्का 

पिंपरी : डुडुळगाव येथे शिवाजी तळेकर यांच्या जागेतील बोअरवेलला (हातपंपाला) पाण्याऐवजी चक्क पेट्रोल येऊ लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बोअरवेलच्या (हातपंप) नळावाटे पेट्रोल येऊ लागताच तळेकर यांच्या घरातील लोकांनी तेथे बादल्या लावल्या. थोडा वेळ जाताच नेमका काय प्रकार आहे, याचा उलगडा झाला. एकीकडे पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वच स्तरातुन संतापाची लाट उसळली असताना पिंपरी चिंचवडमधील डुडुळगावात चक्क बोअरवेलला पेट्रोल येऊ लागले ही घटना थोड्या वेळासाठी का होईना नागरिकांना सुखद देणारी ठरली. चऱ्होलीजवळील डुडूळगाव येथे तळेकर यांच्या घराजवळ बोअरवेल आहे. रविवारी सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरातील मंडळी पाणी भरण्यासाठी बोअरवेलजवळ गेले. प्लास्टिक बादली नळाखाली लावली. बोअरवेलला हापसा दिला असता, केशरी रंगाचा द्रव पदार्थ नळावाटे बाहेर पडू लागला. रंगीत पाणी कसे येऊ लागले. हे पाहण्यासाठी बादली हातात घेतली असता,चक्क पेट्रोलचा वास येऊ लागला. तळेकर यांच्या बोअरवेलला हापसा दिल्यानंतर पेट्रोल येत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. कुतुहलापोटी नागरिकांनी तळेकर यांच्या घराकडे धाव घेतली. बोअरवेलला पेट्रोल येत असल्याचा अजब प्रकार व्हॉटसअ‍ॅपवरून व्हायरल झाला. त्यामुळे गर्दी आणखी वाढली. सुरूवातीला काही मिनिटासाठी बोअरवेलच्या नळावाटे पेट्रोल आले. नंतर मात्र पुन्हा पाणी येऊ लागले. नेमका प्रकार काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला असता, तळेकर यांच्या घरापासून काही अंतरावर पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपाच्या जमिनीखालील टाकीला गळती  होत असल्याने जवळच असलेल्या बोअरवेलच्या खडयात काही अंशी पेट्रेल गळती झाली. ही बाब पेट्रोलपंप चालकाच्याही लक्षात आली. त्यांनी पेट्रोल टाकीच्या गळतीवर तातडीने उपाययोजना केली.देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटरला ८८ रुपये झाला आहे. अशीच परिस्थिती अन्य देशातील शहरात तसेच विविध राज्यांमध्ये आहे. इंधनवाढीचा परिणाम दैनंदिन वापरात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीवर झाला आहे. परिणामी महागाईची झळ सर्वांना बसू लागली आहे. सरकारच्या विरोधात नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करून निषेध नोंदवत आहेत. पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये बोअरवेलच्या नळाला पाण्याऐवजी पेट्रोल येऊ लागल्याने थोडावेळ का होईना नागरिकांना दिलासा मिळाला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPetrolपेट्रोलWaterपाणी