शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा

By राजू हिंगे | Updated: January 21, 2024 22:38 IST

आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो, बलात्काऱ्यांना फासावर लटकवले जाते असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुणे: गुजरातच्या आदेशावरून महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांची आमचं सरकार आल्यानंतर सखोल चौकशी करून  दोषीना जेलमध्ये टाकू  असा इशारा  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी  दिला आहे. दिल्लीश्वर महाशक्ती वार करत असतानाही, महाराष्ट्राची माती लढण्याची प्रेरणा देत असून, महाराष्ट्राला आडवे जाणाऱ्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही. असेही त्यांनी सांगितले.

युवासेनेतर्फे सणस मैदानावर आयोजित 'युवा खेळ समिट' महोत्सवाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला.त्यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.  आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून बलात्काऱ्यांना फासावर चढविले जाते, परंतु, भाजपचे हिंदुत्व हे बलात्काऱ्यांचा सत्कार करते,’ अशी टीका करून आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप राममंदिराचा मुद्दा विसरून गेली होती, त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरील मूठभर माती अयोध्येत नेऊन ‘पहिले मंदिर फिर सरकार’ हा निर्धार केला होता. ‘रघुकुल रीत’ प्रमाणे सरकार आल्यावर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला, करोना संकटकाळात खरी आकडेवारी दाखवली. आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो, बलात्काऱ्यांना फासावर लटकवले जाते, भाजपच्या हिंदुत्वात पॅरोलवरील बलात्काऱ्यांचा सत्कार केला जातो,’ असेही ते म्हणाले. 

जनतेचा मताचा आवाज ऐकू जाईल

‘पुणे शहरात दोन वर्षे प्रशासक राज असून, दररोज कचरा उचलला जात नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत, पाणी तुंबत आहे, नदीकाठ विकसन प्रकल्पाच्या राडारोड्यामुळे नदीपात्र उद्‌ध्वस्त होत आहे. नागरिकांचा आवाज ऐकला जात नाही. दावोसमध्ये मजा मारणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हा आवाज ऐकू जाणार नाही, परंतु, जनतेच्या मतांचा खणखणीत आवाज ऐकू जाईल,’ असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलेतेव्हाच्या अर्थमंत्र्याबाबत तक्रार, आता अर्थमंत्री कोण?

‘अर्थमंत्री फंड देत नाहीत, अशी तक्रार मिंधे गटाचे आमदार करत होते, आता अर्थमंत्री कोण आहेत, हे चाळीस गद्दारांनी सांगावे,’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना केला, तर ‘भाजपकडे असणारे पालकमंत्रीपद आता कोणाकडे आहे,’ असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना केला. ‘महाविकास आघाडीने प्रस्तावित केलेले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ रद्द करण्यात आले. लोहगाव विमानतळाची नवीन इमारत चार महिन्यांपासून बांधून तयार असूनही, खोके सरकारला उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. 

पालकमंत्री पद तुमचं गेलं. तुम्ही काय केलं? 

जे पालकमंत्री पद तुम्ही भांडून, लढून मिळवलं होतं ते पालकमंत्री पद तुमचं गेलं. तुम्ही काय केलं? या बददल भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटते असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर ,  सहसंपर्कप्रमुख  आदित्य  शिरोडकर,   माजी मंत्री  शशिकांत सुतार,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,महादेव बाबर ,शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे, संजय भोसले,  आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे