.जेव्हा एक कप चहासाठी रेल्वे अधिकार्यांनी मोजले १0 रुपये
By Admin | Updated: July 15, 2014 00:55 IST2014-07-15T00:55:44+5:302014-07-15T00:55:44+5:30
रेल्वे स्थानकावर मनमानी कारभार : स्टॉल केले सील

.जेव्हा एक कप चहासाठी रेल्वे अधिकार्यांनी मोजले १0 रुपये
अकोला : रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांंची विक्री करणारे काही व्यावसायिकांचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा प्रत्यक्ष अनुभव दस्तुरखुद्द भुसावळ रेल्वे मंडळाचे सहाय्यक प्रबंधकांनी शनिवारी घेतला. त्यांना चहाच्या ५ रुपयाच्या एका कपासाठी चक्क १0 रुपये मोजावे लागले. एवढेच नव्हे तर कपातील चहाचे प्रमाणदेखील कमी असल्याचे त्यांना आढळून आले. घडल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंडळ अधिकार्यांनी ५ रुपयाचा चहाचा कप १0 रुपयाला विकणार्या फलाट क्रमांक दोनवरील सूर्या फूड अँग्रो लिमिटेड हे स्टॉल सील केले.
अकोला रेल्वे स्थानकावर असलेल्या काही खाद्यपदार्थांंंच्या दुकानांवर मूळ किमतीपेक्षा जादा किमतीने खाद्यपदार्थांंंची विक्री होत असल्याच्या तक्रारी भुसावळ रेल्वे मंडळ प्रबंधकांकडे प्राप्त झाल्या होत्या. पदार्थांंंचा दर्जा आणि त्यांचे प्रमाण देखील कमी असल्याचा त्या तक्रारींमध्ये उल्लेख असल्याने संधीच्या शोधात असलेल्या सहाय्यक प्रबंधकांनी रेल्वे स्थानकाच्या तपासणीदरम्यान सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी रात्री ८.१५ ला अकोला रेल्वेस्थानकाच्या अप लाईनवर शंटिग करणार्या इंजीनची चाके रेल्वे रूळाखाली उतरली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक प्रबंधक प्रदीप बारापात्र आपल्या चमूला सोबत घेऊन विशेष गाडीने अकोल्यात दाखल झाले होते.
इंजीन रुळावर आणण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पहाटे २.३0 च्या सुमारास भुसावळकडे परतण्यापूर्वी त्यांनी फलाट क्रमांक २ आणि ३ ची पाहणी केली. दरम्यान, अजय ठाकूर यांच्या सूर्या फूड अँग्रो लिमिटेड या स्टॉलवर ते पोहोचले. या ठिकाणी त्यांनी चहा व त्याची किमत विचारली. स्टॉलवर हजर असलेल्या कर्मचार्याने एका कपमध्ये अध्र्यापेक्षाही कमी चहा भरून त्यांच्याकडे १0 रुपयांची मागणी केली.
अधिकार्यांची ओळख नसलेल्या त्या कर्मचार्याने चहाच्या दर्जाबाबत अधिकार्यांनी विचारणा केली असता भडकून त्याची कॉलर ओढेपर्यंंंत मजल मारली. मात्र, चहा मागणार्या व्यक्तीची खरी ओळख समजताच त्याने अधिकार्यांच्या पायाशी लोळण घेतले.
शनिवारी सकाळी भुसावळ रेल्वे मंडळ प्रबंधकांच्या चमूने परत अकोला गाठले. स्थानिक अधिकर्यांना सोबत घेऊन त्यांनी अजय ठाकूर यांचे स्टॉल १५ दिवसांसाठी सील केले. मंडळ अधिकार्यांच्या या कारवाईमुळे रेल्वे स्थानकावर मनमानी कारभार करणार्यांमध्ये खळबळीचे वातावरण आहे.