जेव्हा मुस्लीम विद्यार्थी साकारतात राधा- कृष्ण

By Admin | Updated: August 25, 2016 20:34 IST2016-08-25T20:34:28+5:302016-08-25T20:34:28+5:30

मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील श्री़विठ्ठल रुखमाई प्राथमिक व पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत २५ आॅगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला

When Muslim students are Radha-Krishna | जेव्हा मुस्लीम विद्यार्थी साकारतात राधा- कृष्ण

जेव्हा मुस्लीम विद्यार्थी साकारतात राधा- कृष्ण

सचिन गाभने

बुलडाणा, दि. 25  : मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील श्री़विठ्ठल रुखमाई प्राथमिक व पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत २५
आॅगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये मुस्कानबी हिने राधेची वेशभूषा तर शेख कबीर याने कृष्णाची भूमिका वठविली.  या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक
एकात्मतेचा संदेश जोपासला़ शालेय विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधेचा पेहराव केला होता.

शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम दांदडे, बंडू पांडव, गजानन भगत, संजय भारते, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका  स्वाती व्यवहारे व सर्व शिक्षक व शिक्षीका यांनी सर्व विद्यार्थ्यांना राधा व श्रीकृष्णाचा पेहराव करुन श्रीकृष्ण जन्माष्टमीचा देखावा निर्माण केला होता. त्यानंतर मुलांच्या हस्ते नृत्याद्वारे मनोरा निर्माण करुन श्रीकृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात
आली व शेवटी प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

Web Title: When Muslim students are Radha-Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.