नवरा बाहेर जाताच पत्नीने केला सवतीचा खून
By Admin | Updated: May 18, 2017 19:52 IST2017-05-18T19:52:26+5:302017-05-18T19:52:26+5:30
मुंबईमध्ये एका महिलेने आपल्या पतीच्या दुस-या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या भाईंदरमधील ही घटना घडली आहे.

नवरा बाहेर जाताच पत्नीने केला सवतीचा खून
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मुंबईमध्ये एका महिलेने आपल्या पतीच्या दुस-या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या भाईंदरमधील ही घटना घडली आहे. या प्रकरणात महिलेच्या सासूलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्येमध्ये मदत केल्याच्या आरोपाखाली सासूला ताब्यात घेण्यात आलं आहे. संतोष जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. त्यांची ट्रॅव्हल एजन्सी होती. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाईंदरच्या मोरवा येथे राहणा-या संतोष जाधव यांच्या दुस-या पत्नीचा त्यांच्या पहिल्या पत्नीने खून केला. संतोष यांचं सवितासोबत आधी लग्न झालं होतं. नुकतंच त्यांनी गिता नावाच्या महिलेसह दुसरं लग्न केलं. दोन्ही पत्नी संतोषसह भाईंदरच्या मोरवा येथील घरात राहात होत्या.
9 मे रोजी काही कामानिमित्त संतोष बाहेर गेला होता. त्यावेळी दोन्ही पत्नींमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यावर सविताने गिताच्या डोक्यात जोरदार वार केला. पण रूग्णालयात दाखल केल्यानंतर गिता पडली आणि तिचं डोकं भिंतीवर आदळलं असं तिने डॉक्टरांना सांगितलं.
11 मे रोजी संतोष परतल्यानंतर त्याला आपल्या आई आणि सवितावर संशय आला आणि त्याने दोघींविरोधात पोलिसांत खूनाची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतलं. दोघींनीही आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.