जेलमध्ये कधी जायचे ते सांगा?

By Admin | Updated: January 18, 2017 06:52 IST2017-01-18T06:52:38+5:302017-01-18T06:52:38+5:30

राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवू, या खासदार किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

When did you tell me to go to jail? | जेलमध्ये कधी जायचे ते सांगा?

जेलमध्ये कधी जायचे ते सांगा?


पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवू, या खासदार किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘जेलमध्ये कधी जायचे ते सांगा. मी जर चूक केली असेल, तर मला शिक्षा होईल. चूक केली नसेल तर सरकार कोणाचेही आले, तर काहीही करू शकणार नाही.’
पत्रकार परिषदेत पवार यांनी भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘उमेदवार आयात करण्याची वेळ भाजपावर आली आहे. आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही, पण ‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्याची तयारी असेल. महापालिका निवडणुकीत भाजपामध्ये गुंडांना प्रवेश दिला जात असून, ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे, गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांना भाजपात सर्रास प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे भाजपा हा गुंडांचा पक्ष बनला आहे,’ अशी टीकाही पवार यांनी केली. (प्रतिनिधी)
>विध्वंसक वृत्ती चुकीची
गडकरी यांच्या पुतळा हटविण्याच्या घटनेवर पवार म्हणाले, ‘शाहू-फुलेंच्या महाराष्ट्रात खालच्या पातळीवर जाऊन, विध्वंसक कृती करणे चुकीचे आहे. त्याला खतपाणी घालणाऱ्यांना खड्यासारखे दूर करून योग्य समज द्यायला हवी.’

Web Title: When did you tell me to go to jail?