शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी मिळणार तरी कधी ? शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 12:47 IST

विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

मुंबई - मागील काही वर्षांपासून राज्यात पडलेला दुष्काळ आणि यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना आता नव्या सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची प्रतीक्षा लागली आहे. कर्जमाफी करण्याचे आश्वासन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून देण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकरी नव्या सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत. 

राज्याची आर्थिक स्थिती आणि शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेतल्यानंतरच कर्जमाफीची घोषणा होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.  त्यामुळे विधीमंडळात कर्जमाफीची घोषणा होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अधिवेशनाकडे शेतकरी वर्ग लक्ष ठेवून आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

भाजपच्या काळात शेतकरी कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र निकष आणि अटींमुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित होते. तसेच फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीच्या घोषणेसाठी मोठा कालावधी लागला होता. त्यावेळी त्यांनी कर्जमाफीसंदर्भात अभ्यास सुरू असल्याचे म्हटले होते. आता ठाकरे सरकारही अद्याप अभ्यासच करतय का, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत.