शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...जेव्हा नाशिकमध्ये चक्क सायकलवर स्वार होतो ‘इंडियन कोब्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:46 IST

सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे सापाचा व्हिडिओ किंवा फोटो काढण्याचा मोह करु नये. कारण वन कायद्यानुसार सापाचे व्हिडिओ अथवा फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट करणे गुन्हा ठरतो. तसेच फोटो-व्हिडिओ काढताना सापाकडून संबंधिताला धोकाही उत्पन्न होऊ शकतो.

ठळक मुद्देचेतनानगर परिसरात एका बंगल्यामध्ये शेजारच्या मोकळ्या भूखंडावरून ‘इंडियन कोब्रा’ने हजेरी लावली जमिनीमधील पाण्याची उन्हामुळे वाफ होऊ लागल्याने बिळामध्ये राहणारे सर्प बाहेर

नाशिक : कारच्या बोनटमध्ये तर दुचाकीच्या सिटखाली साप आढळला अशा बातम्या अनेकदा कानावर पडतात; मात्र नाशिकच्या चेतनानगर परिसरात इंडियन कोब्रा जातीचा नाग चक्क सायकलवर स्वार झाल्याचे चित्र दुपारी चार वाजेच्या सुमारास पहावयास मिळाले. सायकलवर कोब्रा चढला आणि फना काढून रुबाबदारपणे त्याने बंगल्यातील रहिवाशांना पोझ दिली; मात्र त्याचा हा रुबाब नागरिकांना आकर्षित करणारा नव्हे तर दहशतीखाली आणणारा होता.नाशिकच्या चेतनानगर परिसरात एका बंगल्यामध्ये शेजारच्या मोकळ्या भूखंडावरून ‘इंडियन कोब्रा’ने हजेरी लावली. कुंपणाच्या भिंतीला लागून उभ्या असलेल्या सायकलवरच कोब्रा स्वार झाला अन् सायकलच्या रिंगमधील तारांमध्ये अडकला. बंगल्याच्या संरक्षण कुंपणाच्या आतमध्ये नाग फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी तत्काळ ‘इको-एको’ या प्राणीप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. त्यानंतर स्वयंसेवक अभिजित महाले यांनी बंगल्यात जाऊन नाग सुरक्षितरित्या ‘रेस्क्यू’ केला व त्याची नोंद वनविभागाच्या पश्चिम कार्यालयात केली. लवकरच शहरापासून दुर जंगलाच्या परिसरात नागाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

सध्या आॅक्टोबर हिटमुळे उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून जमिनीमधील पाण्याची उन्हामुळे वाफ होऊ लागल्याने बिळामध्ये राहणारे सर्प बाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधान राहण्याची गरज आहे. सर्प आढळूनआल्यास त्याच्यावर हल्ला करू नये किंवा गोंधळ घालत त्याला कुठल्याहीप्रकारे डिवचण्याचा प्रयत्नही करु नये. असुरक्षिततेची सर्पाला जाणीव झाल्यास त्याच्यापासून मानवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे सर्पमित्रांचे म्हणणे आहे. सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे सापाचा व्हिडिओ किंवा फोटो काढण्याचा मोह करु नये. कारण वन कायद्यानुसार सापाचे व्हिडिओ अथवा फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट करणे गुन्हा ठरतो. तसेच फोटो-व्हिडिओ काढताना सापाकडून संबंधिताला धोकाही उत्पन्न होऊ शकतो.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल