व्हॉटस्अॅप आता डेस्कटॉपवर
By Admin | Updated: January 23, 2015 18:21 IST2015-01-23T01:28:15+5:302015-01-23T18:21:28+5:30
तरुणांचं हे लाडकं अॅप आता कॉम्प्युटरवरसुद्धा वापरता येणार आहे.

व्हॉटस्अॅप आता डेस्कटॉपवर
अनिल भापकर - औरंगाबाद
तरुणाईचं लाडकं मेसेजिंग अॅप असणाऱ्या व्हॉटस्अॅपची मालकी मागच्या वर्षापासून फेसबुककडे गेली. तेव्हापासूनच फेसबूक आणि व्हॉटस्अॅप मिळून काहीतरी मोठा धमाका करणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती. तरुणांचं हे लाडकं अॅप आता कॉम्प्युटरवरसुद्धा वापरता येणार आहे. व्हॉटस्अॅप वेब या नावाने ही सेवा असणार आहे. आजघडीला ५०० दशलक्षपेक्षा जास्त यूजर्स व्हॉटस्अॅपचे जगभरात आहेत आणि दिवसागणिक त्यामध्ये भर पडत आहे.
व्हॉटस्अॅप वेब ही सेवा डेस्कटॉपवर व्हॉटस्अॅप वापरण्याकरिता सुरू करण्यात आली आहे. मात्र यासाठी सध्यातरी फक्त गुगल क्रोम या इंटरनेट ब्राऊजरवरच ही सेवा वापरता येणार आहे. व्हॉटस्अॅप वेब हे तुमच्या मोबाईल व्हॉटस्अॅपची प्रतिकृती असेल. म्हणजे एकाचवेळी तुम्ही कॉम्प्युटर आणि मोबाईलवर व्हॉटस्अॅप वापरू शकाल. तुम्ही व्हॉटस्अॅप वेबच्या मदतीने जो संवाद साधाल तो लगेच तुमच्या मोबाईल व्हॉटस्अॅपवर ही दिसेल.
व्हॉट्सअॅप वेब कसे वापराल?
व्हॉटस्अॅप वेब या सेवाचा लाभ घेण्यासाठी सध्यातरी फक्त गुगलक्रोम ब्राऊजरच वापरावे लागेल.तत्पूर्वी तुम्हाला तुमचे मोबाईलवरील व्हॉटस्अॅप अपडेट करून घ्यावे लागेल. जेणेकरून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकाल. एकदा का लेटेस्ट व्हॉटस्अॅप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल झाले की त्याच्या सेटिंगमध्ये व्हॉटस्अॅप वेब नावाचे एक आॅप्शन येईल. गुगलक्रोम चालू केल्यानंतर https//web.whatsapp.com ही साईट ओपन करावी लागेल.
https//web.whatsapp.com ओपन होईल तेव्हा त्यावर एक क्यूआर कोडचे चित्र तुम्हाला दिसेल. हे चित्र म्हणजे डेस्कटॉप वर व्हॉटस्अॅप वर लॉगीन करण्यासाठी पासवर्ड प्रमाणे काम करेल. या क्यूआर कोडला तुमच्या मोबाईल व्हॉटस्अॅपवरील व्हॉटस्अॅप वेब या आॅप्शनच्या मदतीने स्कॅन करावे लागेल. म्हणजे तुमच्या मोबाईल कॅमेरा या चित्रासमोर धरला की, ते चित्र स्कॅन होईल आणि तुम्ही डेस्कटॉपवर व्हॉटस्अॅपला लॉगीन व्हाल. आता तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवरील व्हॉटस्अॅपची प्रतिकृती डेस्कटॉपवर दिसेल. त्यासाठी मात्र तुमच्या मोबाईलवरील नेट चालू हवा.
व्हॉट्सअॅपचा इतिहास
च्याहूमध्ये काम करणारे जॅन कोम आणि ब्रायन अॅक्टन या जोडगोळीने असा विचार केला की, एसएमएस किंवा ए२२२ाएमएस पाठविण्यासाठी जे पैसे लागतात, त्यापासून जर लोकांची सुटका केली तर? आणि त्यांनी त्या दृष्टीने काम करायला सुरुवात केली.
च्अखेर २००९ साली त्यांनी व्हॉटस् अॅप या नावाने असे मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले, ज्याचा वापर करून मोफत (होय, मोफतच!) एसएमएस पाठविणे शक्य झाले. म्हणजे फक्त टेक्स्टच नाही तर फोटो, आॅडिओ आणि व्हिडिओसुद्धा मोफत पाठविता येतो. त्यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या मोबाईलवर व्हॉटस् अॅप इन्स्टॉल केलेले पाहिजे. व्हॉटस् अॅपला क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते; कारण अँड्रॉईड, आयफोन, ब्लॅकबेरी, सिम्बेन आणि विंडोज फोन यासह जवळपास सर्व प्लॅटफॉर्मचे व्हॉटस् अॅप मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत.