‘व्हॉट्सअ‍ॅप बॉम्ब’च्या अफवांचे पीक

By Admin | Updated: May 21, 2014 08:55 IST2014-05-21T03:27:22+5:302014-05-21T08:55:51+5:30

एकमेकांशी सहजपणे संवाद साधता यावा यासाठी मोबाईल कंपन्यांनी व्हॉट्स अ‍ॅपसारखा पर्याय उपलब्ध करुन दिला

WHATSAPAP BOMB Rumors' Crop | ‘व्हॉट्सअ‍ॅप बॉम्ब’च्या अफवांचे पीक

‘व्हॉट्सअ‍ॅप बॉम्ब’च्या अफवांचे पीक

सुशांत मोरे, मुंबई - एकमेकांशी सहजपणे संवाद साधता यावा यासाठी मोबाईल कंपन्यांनी व्हॉट्स अ‍ॅपसारखा पर्याय उपलब्ध करुन दिला. मात्र सोपा पर्याय असणार्‍या याच व्हॉट्स अ‍ॅपचा आता दुरुपयोग होत असल्याचा प्रत्यय रेल्वे पोलिसांना (जीआरपी) येऊ लागला आहे. बॉम्ब ठेवल्याच्या किंवा स्फोट झाल्याची व्हॉट्स अ‍ॅपवरुन माहिती फिरत असून त्यामुळे रेल्वे पोलीस अक्षरश: वेठीला धरले गेले आहेत. अशा तीन घटना एका आठवड्यात घडल्याने कठोर पाऊल रेल्वे पोलीस उचलण्याच्या तयारीत आहे. १४ मे रोजी भायखळ्याजवळ एका एक्सप्रेसमध्ये रात्री साडे सातच्या सुमारास बॉम्बस्फोट झाल्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅपवरुन फिरु लागली. ही माहिती वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकार्‍यांच्या मोबाईलवर आली. अनेक ओळखीच्यांनी व माध्यमांच्या प्रतिनिधींनीही याबाबतची विचारणा रेल्वे पोलिसांना केल्यानंतर संपूर्ण रेल्वे पोलीस यंत्रणा कामाला लागली. यानंतर १९ मेलाही चर्चगेट स्थानकात संध्याकाळी पाचच्या सुमारास स्फोट झाल्याची आणि बॉम्ब असल्याची बातमी व्हॉट्स अ‍ॅपवरुन फिरु लागली. याबाबतही अनेकांनी व्हॉट्स अ‍ॅपवरूनच रेल्वे पोलिसांना विचारली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी पाच तास चर्चगेट स्थानक आणि स्थानकातील लोकलची तपासणी केली. या दोन घटनांनी रेल्वे पोलिसांना डोकेदुखी ठरत असतानाच मंगळवारी विरार ते चर्चगेट ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅपवरुन फिरु लागली. याची विचारणा रेल्वे पोलिसांना होऊ लागली. विरारमध्ये रेल्वे पोलीस लोकलची तपासणी करत होते. तर दुपारी साडे तीनपासून चर्चगेट स्थानकात विरार लोकलची सुरु केलेली तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Web Title: WHATSAPAP BOMB Rumors' Crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.