ग्रुपमधून काढल्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनवर चाकूहल्ला
By Admin | Updated: May 30, 2015 13:19 IST2015-05-30T13:19:43+5:302015-05-30T13:19:43+5:30
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने ग्रुप मेंबर्सनी थेट अॅडमिनवरच चाकूहल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

ग्रुपमधून काढल्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनवर चाकूहल्ला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने ग्रुप मेंबर्सनी थेट अॅडमिनवरच चाकूहल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात ग्रुप अॅडमिन बंटी कुर्सिजा जखमी झाला असून चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरमधल्या बंटी कुर्सीजाने व्हॉट्सअॅपवर केलेल्या ग्रुपमध्ये अनिल मुखी आणि नरेश रोहरा या दोघांना घेतले होते. हे दोघेही ग्रुपवर अश्लील मेसेज, फोटो व व्हिडीयो शेअर करीत. असे मेसेज ग्रुपवर टाकू नका असे वारंवार सांगुनही या दोघांनी ते न ऐकल्याने बंटीने त्यांना ग्रुपमधून काढून टाकले होते.
यामुळे संतप्त झालेल्या अनिल व नरेशने बंटीला धमकी दिली तसेच जुना एक वाद उकरून काढला. या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. अनिल व नरेशने आणखी दोघांच्या साथीने बंटीवर चाकूहल्ला केला, ज्यात बंटी जखमी झाला. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी अनिल मुखी व नरेश रोहरा यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.