शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विजयी होऊ शकणाऱ्यांना उमेदवारी देण्यात काय चूक? - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:34 IST

भाजपाला दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागतात, याचा अर्थच या पक्षाला विस्तार करता आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- अतुल कुलकर्णी  मुंबई  - भाजपाला दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागतात, याचा अर्थच या पक्षाला विस्तार करता आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. घराणेशाहीविषयीची त्यांची मते मात्र अस्पष्ट दिसली.तुमच्या पक्षात तरी शरद पवार ते पार्थ पवार, असे घराणे आहे. अनेक नेत्यांच्या मुलांसाठी पक्षाने कार्यकर्त्यांना दूर सारले.शरद पवार यांनी आर.आर. पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला नेता केल्याचे राज्याने पाहिले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेकांना त्यांनी नेता बनवले. राहिला प्रश्न घराणेशाहीचा वा नेत्यांच्या मुलांचा. ज्या नेत्यांच्या मुलांनी स्वत:ला सिद्ध केले आहे, तेथील लोकांनी जर त्याचे नेतृत्व मान्य केले आहे आणि ज्याच्यामध्ये इलेक्टीव्ह मेरिट आहे, अशा तरुणांना आम्ही उमेदवारी देण्यात चूक काहीच नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.पण हाच न्याय तुम्ही सुजय विखे यांना दिला नाही. त्यांना उमेदवारी का नाकारली ?नगर जिल्हा राष्टÑवादीची ताकद असलेला आहे. ६ पैकी ५ जागा आम्ही तेथे लढत आलोय. आमचाच पक्ष भाजपाचा पराभव करू शकतो हे आम्हाला माहिती असल्यामुळेच आम्ही ती जागा स्वत: लढवण्याचा निर्णय घेतला. लागणारा निकालच तुम्हाला याचे उत्तर देईल आणि सुजयला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, आम्ही ती जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला, एवढाच त्याचा अर्थ आहे.छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक असे अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत जाण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन नेतृत्व कसे उभे राहणार?प्रत्येकाने कोठे काम करावे हा निर्णय स्वत: घ्यायचा असतो. गणेश नाईक यांनी आनंद परांजपे यांचे नाव सुचवले, तर दिलीप वळसे पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा तरुण चेहरा पक्षात आणला. त्यामुळे नव्यांना संधी दिलीच. भुजबळ यांची व्यक्तिगत कारणांमुळे दिल्लीत जाण्याची इच्छा नाही.भाजपा सोशल मीडियामध्ये आघाडीवर आहे. मग तुमचा पक्ष मागे का?भाजपाकडे सोशल मिडीया चालवणारे पगारी नोकर आहेत. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षाच्या विरोधात लिहीणाऱ्यांना ट्रोल करत असतात. मोठी संख्या त्यांनी पगारावर पोसली आहे, कारण त्यांच्याकडे सत्ता आहे, साधनसंपत्ती आहे. आमची तशी परिस्थिती नाही. पण एवढे करूनही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व भाजपाची खिल्ली सध्या उडवली जात आहे.राज ठाकरे यांच्या मनसेसाठी तुम्ही एक जागा सोडणार होतात. त्याचे काय झाले?राज ठाकरे यांचे सहकार्य घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांच्या सभांना गर्दी होते. त्यांची भाषणे टोकदार असतात. राज यांचे आताचे भाषण मुख्यमंत्र्यांना एवढे झोंबले की, त्यांनी भाजपा शिवसेनेच्या संयुक्त सभेत अशा भाषणांनी विचलीत होऊ नका, असे सांगितले. राज ठाकरे स्वतंत्र विचारांचे आहेत आणि ते आघाडीत नसले तरी भाजपाला विरोध करणाºयाचे आमच्याकडे कायम स्वागतच आहे.प्रकाश आंबेडकर यांच्याशी कोठे बिनसले? त्याचा काय परिणाम होईल?दोन्ही काँग्रेसने त्यांच्यासोबत तीन चार बैठका घेतल्या. त्यांना चार जागा देण्यास तयारी दर्शवली. मात्र त्यांनी नांदेड, बारामतीच्या जागाही मागितल्या, तेव्हा लक्षात आले की ते कोणाचे तरी हस्तक म्हणून काम करत आहेत व त्यांना धर्मनिरपेक्ष विचारांना एकत्र आणण्याची इच्छा नाही. राज्यघटना बदलण्याची भूमिका संघाचे लोक घेत आहेत. अशा विचारांच्या लोकांचे राज्य घालवण्यासाठी त्यांनी अजूनही आमच्यासोबत यावे. अन्यथा त्यांच्यामुळे भाजपाला मदत होत आहे हा आक्षेप खरा ठरेल.पक्ष मजबूत करण्यासाठी आयाराम गयारामांवर अवलंबून न राहता, प्रमुख कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, असे सांगत काहीही करून निवडणूक जिंकणे हे एवढेच ध्येय असता कामा नये, असेही ते म्हणाले. मात्र पक्षातील घराणेशाहीबद्दल ते म्हणाले की, निवडणूक जिंकू शकणाºयांना उमेदवारी देण्यात काहीच चूक नाही.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक