शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शेतं आक्रसून आक्रसून संपून गेली तर माणसं काय खातील?; शेताशेतांत उभारली सिमेंटी घरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 07:11 IST

गावं आक्रमण करतायत शेतांवर. शेती म्हणजे मायमाती, काळी आई असं म्हणणारे भाबडे लोक हरवले आहेत नाण्यांच्या खणखणाटात कुठेतरी.

बालाजी सुतार, कवी-कथाकार

गावातून बाहेर जाणारी सडक आहे. त्या दिशेला गावापासून चार सहा किलोमीटर अंतरावर एक-दोन बारकी-बारकी गावं आहेत. खूप वर्षांत त्या सडकेने गेलो नव्हतो. परवा काही कारणाने एका गावाला जायला निघालो, तर रस्त्याकडेनी नुसती घरं-घरं झालेली. प्रत्येक शेताच्या तुकड्यात बारीकमोठी कितीतरी घरं. सगळी मागच्या पाचपंधरा वर्षांत तिथे अवतरलेली. जिथं अजून घरं नाहीत, त्या तुकड्यांमध्येही कुठे पाया खोदलेला, तर कुठे वाळू-विटांचे ढीग. माझ्या लहानपणी गावाबाहेर पडल्यावर या वाटेनं जाताना पोरांच्या आत दिवसासुद्धा भय दाटून येई.

धूळमाखली अरुंद पायवाट आणि दुतर्फा अंगावर येणारा गर्ददाट गच्च झाडोरा. मध्येच एक बारीकसा पावसाळी ओढा आणि भोवतीने चौफेर दाटलेली किर्रर्र शांतता असे. क्वचित आसपास कुठे काम करत असलेल्या एखाद्या गड्याची हाळी ऐकू येई, एरवी काही पाखरांचे आवाज वगळता खरोखरच पोराटोरांना नखशिखांत भेदरवणारी किर्रर्र शांतता असे भरदिवसा तिकडे. घनदाट भय वाटे त्या पायवाटेनं पलीकडे जाताना. आणि आता त्या वाटेला गिळून टाकलेल्या अजगरासारखी ही लांबलचक डांबरी सडक! आणि तो गच्च मातलेला झाडोरा कुठे गेला इकडचा? भोवतीभरातल्या शेतांमधून अधूनमधून दिसणारे गवताने किंवा तूरकाड्यांनी शाकारलेले गोठे नाहीसे झालेले किंवा पत्र्याच्या भक्कम शेडमध्ये बदललेले आणि शेताशेतांत बांधली जात असलेली ही सिमेंटी घरं.

या रस्त्याने जाताना आता भीती वाटत नाही. म्हणजे वयाने वाढलेल्या माझं सोडा, आताच्या पोरांनाही ती वाटत नसणार. सगळीकडे घरंच घरं, माणसंच माणसं दिसत असल्यावर कुणाला भीती का वाटेल? माणसं गावाबाहेर फार राहायला आलीयत. गावात माणसांची गर्दी आहेच, पिढ्यान‌्पिढ्या मोठमोठी कुटुंबं राहत आली होती, ती घरं पुढच्या पिढ्यांच्या चौकोनी ‘फॅमिलीं’ना अपुरी वाटून लोक गावाबाहेर स्वत:च्या किंवा इतरांच्या शेतात जागा घेऊन घरं बांधत आहेत. ज्या वाटा– रस्त्यांना, शेतांना ‘मार्केट’ आलेलं आहे, तिकडे तर घरा-दुकानांची आणि माणसांची गर्दी बघून कधीकाळी पाहिलेलं तिकडचं शेतशिवार तेव्हा आपण स्वप्नात पाहिलेलं होतं की काय, अशी शंका यायला लागते, इतकं गावठाण बदललं-विस्तारलं आता.

माझ्या लहानपणी गावालगतच्या मोकळ्या जागेत किंवा शेतात सरकारने गरीब लोकांना राहण्यासाठी खूप लहान-लहान जागा दिल्या होत्या. जमिनीच्या त्या तुकड्यांना ‘फलाट’ असं म्हणत. त्या टीचभर फलाटांवर लोकांनी झोपडीसारखी बारीकशी घरं बांधली आणि गावातली काही, गावकुसाबाहेरची काही मंडळी तिथे राहायला गेली, तेव्हा गावात मजबूत जुन्या घरांमधून राहणारे लोक त्या माणसांकडे काहीशा हलकेपणाच्या भावनेने बघत. आता गावापासून सगळ्या दिशांनी अर्ध्या एक किलोमीटरपर्यंत शेतजमिनीचे ‘प्लॉट’ पाडून ते विकण्याचा- विकत घेण्याचा धंदा अत्यंत तेजीत चाललेला आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापली की, एकरकमी भरमसाठ पैसा हातात येतो. चालू पिढी पैशांत खेळायला लागते. पुढच्या पिढ्यांची चिंता करायला कुणालाच वेळ, गरज, सवड उरलेली नाहीय. गावालगतची शेतं क्रमश: संपत चाललेली दिसतात. गावं आक्रमण करतायत शेतांवर. शेती म्हणजे मायमाती, शेती म्हणजे काळी आई असं मनापासून म्हणणारे ते भाबडे लोक हरवले आहेत नाण्यांच्या खणखणाटात कुठेतरी. शेतं संपून गेली तर माणसं काय खातील कुणास ठाऊक!    majhegaane@gmail.com

टॅग्स :Farmerशेतकरी