शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचं काय होणार? फडणवीसांकडून चर्चेवर पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 14:40 IST

"खरे तर राज्यपालांचे पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वासमत प्राप्त होत नाही, तोवर कॅबिनेटची मिटिंग घ्यायची नसते, हा संकेत आहे. तरी तुम्ही कॅबिनेटची बैठक घेतली."

संपूर्ण वाटचालीत एक शिवसैनिक आज राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांची एकूण कारकीर्द आणि स्वभाव बघितला तर, नेत्यांच्या उपलब्धतेचे जे डेफिसिट तयार झाले होते ते दूर होईल. लोकांना आपले नेते आपल्यात हवे, असे सातत्याने वाटत होते. हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. मुंबईतच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, एका कॉलवर आणि शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न हा नेता करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. ते शिंदे सरकारने बहुमताची अग्नीपरीक्षा जिंकल्यानंतर विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, "भलेही शेवटच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही काही निर्णय घेतले. खरे तर राज्यपालांचे पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वासमत प्राप्त होत नाही, तोवर कॅबिनेटची मिटिंग घ्यायची नसते, हा संकेत आहे. तरी तुम्ही कॅबिनेटची बैठक घेतली. त्या बैठकीत काही निर्णयही घेतले मग तो संभाजीनगरचा असो, धाराशिवचा असो की तो दि. बा. पाटील यांचा असो किंवा इतरही काही निर्णय असतील. जरी ती कॅबिनेट संकेताप्रमाणे घेता येत नाही, तरी तुम्ही निर्णय घेतले असले तरी, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की आपलीही भूमिका तीच आहे. आपणही त्याच भूमिकेचे आहोत." 

तसेच, यामुळे काळजी करू नका.  तुमच्या शेवटच्या कॅबिनेटचे निर्णय पुन्हा कॅबिनेटमध्ये घेऊन ते निर्णय लागू करण्याचे काम हे सरकार करेल, हा विश्वास तुम्हाला देतो. तसेच संपूर्ण सभागृहाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचे अतीशय मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि विरोधी पक्षालाही सहकार्याची विनंती करतो, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभा