युती निवडणूक झाल्यावर करणार काय? - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: January 10, 2017 18:48 IST2017-01-10T18:30:53+5:302017-01-10T18:48:59+5:30
कोणत्याही क्षणी मुंबईसह 10 महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते, मात्र अद्याप युतीच्या निर्णयाबात संभ्रम आहे.

युती निवडणूक झाल्यावर करणार काय? - उद्धव ठाकरे
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 : कोणत्याही क्षणी मुंबईसह 10 महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते, मात्र अद्याप युतीच्या निर्णयाबात संभ्रम आहे. युती काय निवडणुक झाल्यावर करणार काय? असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
युतीचा निर्णय़ाबात पेच कायम असल्यामुळे आणि भाजपकडून कोणताही प्रतिसाद न आल्यानं शिवसेनेनं स्वबळासाठी तयारी सुरु केल्याचे दिसतं आहे. मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंनी इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती घेऊन एकला चलोचे संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांसाठी शिवसेनेनं पडताळणीही सुरु केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार की पुन्हा एकदा एकमेकांविरोधात उभे राहणार पाहणं महत्वाचं आहे.