शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे यांनी मंत्री म्हणून काय दिवे लावले, ते आता लावणार? विनायक राऊतांचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:55 IST

Vinayak Raut on Narayan Rane, Eknath Shinde: पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला बाहेर फेकले जाईल. अजित पवारांना सुद्धा कार्य कक्षेबाहेर फेकले जाईल. भाजप स्वतः एकटी लढणार आणि शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांना लटकवणार आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. 

रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघामध्ये भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी दिल्याने ही लोकसभा निवडणूक चुरशीची झाली आहे. गेल्या दोन वेळेस राणे पुत्राचा दणकून पराभव झाला होता. अशातच आता खुद्द राणे उभे ठाकल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसू शकतो. ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपणच जिंकणार, २.५ लाख मतांनी जिंकणार असा दावा केलेला आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष माझ्या बाजूने आहेत. उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिलला रत्नागिरी सभा होईल. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या रूपाने विजयाचा पहिला पुकार ते देतील. 3 मे रोजी कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील, असे राऊत म्हणाले आहेत.या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल. पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला बाहेर फेकले जाईल. अजित पवारांना सुद्धा कार्य कक्षेबाहेर फेकले जाईल. भाजप स्वतः एकटी लढणार आणि शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांना लटकवणार आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. 

मनसेची रत्नागिरीत सभा होऊ दे. मोर नाचतो म्हणून तुडतुडं  देखील नाचते. कोणाची तळी उचलत आहे याचे भान ठेवा. मुंबई गुजरातला जोडायचे षडयंत्र सुरू आहे. गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे काम सुरू आहे. कपटी लोकांसाठी मनसे जर पुढे येत असेल तर जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असा इशाराही राऊत यांनी दिला. 

विनायक राऊत मंत्री पदासाठी हपापलेला नाही. माझी पक्षासाठी निष्ठा कायम आहे. नारायण राणे यांनी मंत्री म्हणून काय दिवे लावले आहेत? असा सवाल करत मंत्री म्हणून काही केलेले नाही आता काय करणार आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणे Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग