अल्पमतातील सरकार म्हणजे काय?
By Admin | Updated: November 13, 2014 01:32 IST2014-11-13T01:32:46+5:302014-11-13T01:32:46+5:30
ज्या सरकारकडे स्वत:चे असे कायमस्वरूपी बहुमत नसते अशा सरकारला लोकशाहीत अल्पमतातील सरकार म्हटले जाते.

अल्पमतातील सरकार म्हणजे काय?
मुंबई : ज्या सरकारकडे स्वत:चे असे कायमस्वरूपी बहुमत नसते अशा सरकारला लोकशाहीत अल्पमतातील सरकार म्हटले जाते. निवडणुकीत सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या निम्म्या जागाही न जिंकलेला पक्ष किंवा आघाडी असे सरकार स्थापन करते. कागदावर गणित करून दाखविता येईल, एवढे बहुमत अशा सरकारकडे नसते. तरीही सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकून किंवा अविश्वास ठराव फेटाळला जाऊन असे सरकार टिकून राहू शकते.
सभागृहात बहुमताने ठराव जिंकला म्हणून असे मुळातच अल्पमतात असलेले सरकार बहुमताचे सरकार होऊ शकत नाही. याचे कारण असे, की सभागृहातील विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी अथवा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या निम्म्याहून सदस्यांच्या पाठिंब्याची गरज नसते. किंबहुना असे ठराव आवाजी मतदानानेही मंजूर केले जाऊ शकतात. प्रत्यक्ष मतदान झालेच, तरी त्या वेळी हजर असलेल्या व मतदान करणा:या सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणो पुरेसे असते.
राजकीय जाणकारांच्या मते, अल्पमतातील सरकार चालविणारे फडणवीस हे काही पहिले नाहीत़ यापूर्वी केंद्रात आणि राज्यांत अल्पमतातील सरकारे आली आणि नांदलीत़ केंद्रात पहिले अल्पमतातील सरकार 1991 मध्ये पी़ व्ही़ नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली आल़े 1991 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण 244 जागा मिळाल्या होत्या़ भाजपाला 12क् आणि व्ही़ पी़ सिंह यांच्या जनता दलाच्या झोळीत 69 जागा पडल्या होत्या़
काही अपक्ष आणि डाव्या पक्षांच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या आधारे राव सरकार अस्तित्वात आल़े विशेष म्हणजे या सरकारने आपला पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण केला़ यानंतरच्या काळात चौधरी अजितसिंह यांची जनता पार्टी, तेलगू देसम आणि झारखंड मुक्ती मोर्चा अशा काही पक्षांच्या खासदारांना आपल्याकडे वळवून राव सरकारने कामचलाऊ बहुमतही जमवले होत़े
राज्यातही अशाप्रकारची अनेक उदाहरणो मिळतील़ त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीत अल्पमतातील सरकारे आलीत आणि चालली़ हरियाणात भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील गत काँग्रेस सरकार अल्पमताच्या कुबडय़ांवरच तरले होत़े अलीकडे दिल्लीत भाजपाने अल्पमतातील सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न चालवले होत़े मात्र नंतर बदनामीच्या भीतीने भाजपाने हे प्रयत्न थांबवले होत़े
हुड्डा सरकारचे उदाहरण
हरियाणात भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील गत काँग्रेस सरकार अल्पमताच्या कुबडय़ांवरच तरले होत़े काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आधारावर या सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण केला होता़ यापूर्वीही एकदा काँग्रेसने स्व़ भजनलाल यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा अल्पमतातील सरकार चालवले आह़े