"हे कसलं सरकार" ? एकनाथ खडसेंचा घरचा अहेर
By Admin | Updated: April 7, 2017 14:16 IST2017-04-07T14:12:06+5:302017-04-07T14:16:40+5:30
विविध आरोपांमुळे मंत्रीपदावरुन दूर व्हावे लागलेल्या एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना आपल्याच सरकारला अडचणीत आणले.

"हे कसलं सरकार" ? एकनाथ खडसेंचा घरचा अहेर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - विविध आरोपांमुळे मंत्रीपदावरुन दूर व्हावे लागलेल्या एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना आपल्याच सरकारला अडचणीत आणले. शालेष पोषण आहार साहित्य वितरण घोटाळयावर चर्चा सुरु असताना त्यांनी आपल्याच सरकारला खडे बोल सुनावले.
शालेष पोषण आहार साहित्य वितरण व्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करु असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. त्यावर खडसेंनी जोरदार आक्षेप घेतला. तुम्ही मंत्री आहात शिफारस कसली करता ? शिफारस न करता थेट चौकशीचे आदेश द्या, हे कसलं सरकार ? या शब्दांमध्ये त्यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला.
शालेष पोषण आहार साहित्य पुरवण्याची काम ठराविक ठेकेदारांनाच कशी मिळतात ? तेच तेच ठेकदार भाग्यवान कसे ठरतात ? या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खडसेंनी केली.