शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेला नेमकी गर्दी किती? हा व्हिडीओ पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 08:23 IST

अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली

मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. केवळ सत्ताच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावण्याची वेळ आली. शिवसेनेचे बहुतांश आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे पक्षसंघटना मजबूत करण्याचं मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभे राहिले. त्यात आता पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभरात ठिकठिकाणी सभा घेत आहे. त्यातीलच पहिली सभा रत्नागिरीच्या खेड इथं पार पडली. 

खेडच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली. ही सभा अतिविराट होती, या गर्दीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले. अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली. खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची ही सभा झाली. सत्तासंघर्षानंतर पहिली जाहीर सभा झाली. हे मैदान तुडुंब भरलेले आहेत. रस्ते दोन्ही बाजूने तुडुंब भरलेले आहेत असा दावा माजी खासदार अनंत गीते यांनी केला. खालील दिलेल्या व्हिडिओवरून उद्धव ठाकरेंच्या सभेला किती गर्दी होती याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. 

"भाड्याने माणसे आणली तरी मला संपवू शकत नाहीत"मुंबई, पुणे, ठाणे येथून भाड्याची माणसे आणून किती प्रयत्न केले तरी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना राजकारणातून कोणीही संपवू शकत नाही असा घणाघात माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. एकदा नाही तर शंभर वेळा जरी उद्धव ठाकरे आले तरी आम्हाला पराभूत करू शकत नाहीत. उलट तुम्ही जितक्या वेळा याल तेवढे अधिक लीड आमचे वाढेल असा विश्वास कदमांनी व्यक्त केला. 

तसेच उद्धव ठाकरे यांनी माझा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. जणू ही शिवाजी पार्कचीच सभा वाटत आहे. बाहेरची माणसे आणून स्थानिक राजकारण करता येत नाही. दापोली मतदारसंघातील २-४ टक्के तरी लोक यांच्यासोबत आहेत का? असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला आहे. 

१९ तारखेला याच मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच ठिकाणी, त्याच मैदानात १९ तारखेला सभा घेणार असून व्याजासह उत्तरे देणार असल्याचं रामदास कदमांनी सांगितले. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे