शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोर्लई जागेत नक्की काय?; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 06:21 IST

अखेर ठाकरेंच्या कथित बंगल्यांप्रकरणी गुन्हा; तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, सदस्य रडारवर

अलिबाग - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे असलेल्या जागेत कथित १९ बंगल्यांप्रकरणी रेकॉर्डमध्ये खाडाखोड केल्याबद्दल रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच,  सदस्य यांच्याविरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तत्कालीन ग्रामसेवक देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

कोर्लई जागेत नक्की काय?रेवदंडा - मुरूड रस्त्यावर कोर्लई गावापासून एक किलोमीटरवर समुद्रकिनारी बाजूला ९ एकर जागा आहे. जागेला कुंपण आहे. या जागेत सध्या दोन मोडकी घरे, एक विहीर, नारळ, चिकूची झाडे, खतनिर्मिती टाक्या आहेत. मात्र, कथित १९ बंगले कुठेही दिसत नाहीत. जागेत गवत वाढलेले आहे.

असे आहेत आराेप... : ९ एकर जागा आर्किटेक्ट कै. अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली. या जागेत १९ बंगले बांधले. उद्धव ठाकरे यांनी ही बाब लपवून ठेवली. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दबाव आणून अधिकाऱ्यांना कागदपत्रांत छेडछाड केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला हाेता.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKirit Somaiyaकिरीट सोमय्या