शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 06:13 IST

आरटीआयमध्ये उलटसुलट माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधीसाठी किती खर्च आला, याची नेमकी आकडेवारी संबंधित विभागाकडे नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत याबाबत दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली.सामान्य प्रशासन विभागाने ‘आरटीआय’मध्ये २ कोटी ७९ लाख खर्च झाल्याचे कळविले आहे तर प्रथम अपिलात ४ कोटी ६३ लाख खर्च झाल्याचे सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळविलेल्या अर्जातून ही माहिती पुढे आली आहे.सरकारचा शपथविधी दोन टप्प्यांत झाला आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री ठाकरे व सहा मंत्र्यांचा तर नंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा विधान भवनामध्ये शपथविधी झाला. त्यासाठी आलेल्या खर्चाबाबत ‘आरटीआय’अंतर्गत अनेक अर्ज सामान्य प्रशासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे करण्यात आले. गलगली यांच्या अर्जावर विभागाचे कक्ष अधिकारी आर. आर. गायकवाड यांनी खर्च २ कोटी ७९ लाख रुपये झाल्याचे कळविले. त्याबाबत अपील केल्यानंतर अपील अधिकारी अजय बोस यांनी खर्च ४ कोटी ६३ लाख झाल्याची माहिती दिली. त्यामुळे अचूक माहिती सरकारने माहिती अधिकार कायदा अधिनियम २००४ चे कलम ४ अंतर्गत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी गलगली यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी