शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

भाजपला 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन काय साध्य करायचे आहे? नितीन गडकरी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 15:57 IST

"...तर आपण सेफ आहोत आणि भारतीय म्हणजे सर्वच आहेत"

राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगात आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या घोषणाही दिल्या जात आहेत. यातच, भाजपकडूनही 'एक हैं, तो सेफ हैं' अशी घोषणा देण्यात आली. याची राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू आहे. यासंदर्भात आता, भाजप नेते नितीन गडकरी यांनीही भाष्य केले आहे. "जर या देशात जात, पंथ, धर्म, भाषा सोडून आपण सर्वजन भारतीय म्हणून एक राहिलो, तर आपण सेफ आहोत आणि भारतीय म्हणजे सर्वच आहेत," असे गडकरी यांनी म्हटले आहे. 

भाजपला लव्ह जिहाद असो अथवा वर्तमानपत्रांमध्ये 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन नेमके काय साध्य करायचे आहे या निवडणुकीत? असा प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले, "जर या देशात जात, पंथ, धर्म, भाषा सोडून आपण सर्वजन भारतीय म्हणून एक राहिलो, तर आपण सेफ आहोत. आणि भारतीय म्हणजे सर्वच आहेत. काही लोकं काय आहेत, अँटी मुस्लीम असा अर्थ काढतात. तो नाही. आम्ही अँटी मुस्लीम नाही, अँटी दलित नाही, अंटी शिख नाही. आम्ही बहू संख्याक आणि अल्पसंख्याक मानत नाही. आम्ही सर्वजन एक आहोत, आम्ही सर्वजन एका समाजाचे अंग आहोत. आमचा इतिहास, संकृती आणि वारसा एक आहे. आम्ही गुरुद्वाऱ्यात जाऊनही पाया पडतो." गडकरी एका मुलाखतीदरम्यान एबीपी माझासोबत बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले, "एक दिवस मला वाटले की, येथे सुलेखा ताई कुंभारेंनी एक गौतम  बुद्धांचे टेम्पल बांधले आहे. मी आणि माझ्या पत्नीने तेथे जाऊन एक तास बसून ध्यान केलं. मला भगवान गौतम बुद्धाची पूजा करताना, चिंतन करताना जेवढा आनंद मिळतो तेवढाच विवेकानंदांच्या प्रतिमे समोर बसताना अथवा रामाच्या मंदिरात जाऊनही तोच आनंद मिळतो." 

एवढेच नाही तर, "मला असे वाटते की, हे व्यवस्थित समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि मीडियाने विशेषतः यात विभाजन करण्या पेक्षा या विचारामागे असणारे एकात्म दर्शन लोकांपर्यंत पोहोचवले, तर खरा अर्थ त्यातून जाईल," असेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा