शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 10:04 IST

आमदारांच्या कार्यक्षेत्रात येतात ३०० गावे, खासदारांना बघावी लागतात १,८०० गावे

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभेच्या आमदारांना लोकसभेच्या खासदारांपेक्षा अधिक पगार /भत्ते मिळतात. आमदारांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या शहरी मतदारसंघांचा अपवाद वगळता सुमारे तीनशे गावे येतात, तर खासदारांच्या कार्यक्षेत्रात तब्बल १,८०० गावे येतात. तरीही पगार, भत्त्यांबाबत खासदारांपेक्षा आमदार सुखी आहेत. दोघांनाही एक लाख रुपये पगार आहे आणि विविध भत्ते मिळतात ८८ हजार रुपये. म्हणजेच दोन्ही मिळून आमदार, खासदारांना प्रत्येकी १ लाख ८८ हजार रुपये मिळतात.  खासदारांना २०१८ पर्यंत ५० हजार रुपयेच पगार मिळायचा तो वाढवून एक लाख रुपये करण्यात आला. तथापि, २०१८ पर्यंत खासदारांना विमान प्रवासाच्या तिकिटाची जी रक्कम असेल त्याच्या २५ टक्के रक्कम प्रवास भत्ता म्हणून मिळायची. २०१८ मध्ये पगारवाढ दिली, पण हा भत्ता बंद झाला. 

मिळणारा विकास निधी सारखाचआमदारांना विकास निधी (आमदार निधी) मिळतो वर्षाला ५ कोटी रुपये. तीनशे गावांमागे ५ कोटी रुपये या न्यायाने खासदारांना १,८०० गावांमागे किमान ३० कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळायला हवा, पण तो मिळतो वर्षाकाठी ५ कोटी रुपये. म्हणजे पाच वर्षांत १,८०० गावांसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीवर खासदारांना समाधान मानावे लागते. आमदार आणि खासदारांना विकास निधी सारखाच मिळतो.

कोणत्या मिळतात सवलती? nखासदारांच्या पीएचा पगार म्हणून ४० हजार रुपये दिले जातात, आमदारांच्या पीएना २७,५०० रुपये इतका पगार आहे. खासदार आणि आमदारांनाही रेेल्वेचा प्रवास मोफत आहे. विमान प्रवासाचे ३२ मोफत पास आमदारांना दरवर्षी मिळतात. म्हणजे ३२ वेळा ते विमानाने मोफत जाऊ शकतात.nखासदारांना असलेल्या सवलतीत फारसा फरक नाही. त्यांना ३४ वेळा विमान प्रवास मोफत आहे. खासदारांना सरकारकडून दिल्लीत घर मिळते. पण, तेथे पुरविलेल्या सोफा वा अन्य फर्निचरचे पैसे भरावे लागतात.  

मुंबईत निवासासाठीही आमदारांना अतिरिक्त पैसे मुंबईत मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी सुरू आहे, मॅजेस्टिक आमदार निवास बऱ्याच वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे उर्वरित आमदार निवासात ज्या आमदारांना एक खोली आहे, त्यांना ३५ हजार रुपये, तर ज्यांना एकही खोली नाही त्यांना ७० हजार रुपये महिन्याकाठी दिले जातात. पगार व इतर भत्त्यांव्यतिरिक्तची ही रक्कम आहे. ती गृहीत धरली तर आमदारांना खासदारांपेक्षा अधिक पगार आहे. 

खासदार प्रत्येक गावात जातील कसे? अनेक ठिकाणी अशी तक्रार केली जाते की, निवडून आल्यापासून आमच्या गावाकडे खासदार फिरकलेच नाहीत. एका खासदारांनी याबाबत हिशेब मांडला. ते म्हणाले की, एका वर्षाचे ३६५ दिवस म्हणजे पाच वर्षांत दिवस होतात १,८२५. त्यापैकी वर्षातून १०० दिवस संसदेचे अधिवेशन असते. म्हणजे पाच वर्षांत ५०० दिवस संसदेच्या अधिवेशनात जातात. याशिवाय खासदार कोणत्या ना कोणत्या संसदीय समितीमध्ये असतात. त्या समितीच्या बैठकांसाठी दिल्लीला जावे लागते, नाहीतर देशात दौरे करावे लागतात. पक्षाच्या बैठकांसाठी जावे लागते ते वेगळेच.  याशिवाय, विधिमंडळाची दोन अधिवेशने मुंबईत, तर एक अधिवेशन हे नागपुरात असते. या अधिवेशनात आपल्या मतदारसंघांमधील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी खासदारांना जावे लागते.याव्यतिरिक्त वर्षातून किमान ३०-४० दिवस मंत्रालयात जावे लागते. अशावेळी मतदारसंघांमध्ये एका गावात एकदा जायचे ठरविले तरी ते खासदारांना शक्य होत नाही. 

टॅग्स :MLAआमदारMember of parliamentखासदारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४