शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 21:13 IST

Supriya Sule Property: विश्वास बसणार नाही, एक बाब लक्ष वेधून घेणारी आहे ती म्हणजे सुळे यांनी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्याकडून उधारीवर पैसे घेतले आहेत.

शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे सध्या देशभरात चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात त्यांचीच वहिणी सुनेत्रा पवार लढत आहेत. अवघ्या देशाचे लक्ष या बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. आज सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनी आपापली संपत्ती जाहीर केली आहे. सुप्रिया सुळेंची संपत्ती त्यांनी जाहीर केली आहे. परंतु, त्यात एक बाब लक्ष वेधून घेणारी आहे ती म्हणजे सुळे यांनी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उधार घेतले आहे. 

विश्वास बसणार नाही, परंतु सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार सुप्रिया यांनी पार्थ पवारांकडून २२ लाख रुपये आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे म्हटले आहे. आणि महत्वाचे म्हणजे सुळेंच्या डोक्यावर एवढेच काय ते कर्ज आहे. सुळे यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची १४२ कोटींची मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. तर शेतीतून सुळे यांना यंदा शून्य रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांची ११४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सुप्रिया यांच्याकडे कोणतीही कार नाही. आयकर विवरणाप्रमाणे सुळे यांचे उत्पन्न 1  कोटी 78 लाख 97 हजार 460 रुपये एवढे आहे. 42 हजार 500 रुपये रोख रक्कम, बँक खात्यातील ठेवी 11 कोटी 83 लाख 29 हजार 195, शेअर बाजारात 16 कोटी 44 लाख 24 हजार 140 रुपये गुंतवणूक, राष्ट्रीय बचत योजनेत 7 लाख 13 हजार 500 रुपये एवढी गुंतवणूक आहे. 

तर सुप्रिया सुळे यांनी 3 कोटी 50 लाख 86 हजार 080 रुपयांचे कर्ज म्हणून दिले आहे. तर सदानंद सुळे यांनी 60 कोटी 8 लाख 71 हजार 253 रुपये कर्ज म्हणून दिलेले आहेत. दोघांकडेही एकही कार, वाहन नाही. सुप्रिया सुळेंकडे 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचे सोने आहे. एक कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपयांचे हिऱ्याचे दागिने आहेत. सुळेंकडे 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये एवढ्या किंमतीची शेत जमिन आहे. जंगम मालमत्ता 38 कोटी 06 लाख 48 हजार 431 रुपये एवढी आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारparth pawarपार्थ पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४