शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षासाठी काय करता? भाजपच्या मंत्र्यांना आता द्यावा लागणार हिशेब; ‘ते’ स्वीय सहायक घेणार अंमलबजावणीचा आढावा

By यदू जोशी | Updated: May 17, 2023 12:40 IST

सरकार आपले असूनही पक्षातील लोक, पक्षाशी संबंधित संस्था, संघटना व व्यक्तींची कामे होत नाहीत, अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आता मंत्र्यांना उत्तरदायी करण्यात आले आहे.

मुंबई :  भाजपच्या राज्यातील सर्व मंत्र्यांनी महिन्यातील चारही शुक्रवारी राज्यात दौरे करावेत आणि त्या दिवशी केवळ पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची सरकारमधील कामे, पक्षाच्या माध्यमातून सरकारप्रति असलेल्या अपेक्षांची पूर्तता एवढाच अजेंडा ठेवावा, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असून, त्यानुसार दौरेदेखील सुरू झाले आहेत. 

सरकार आपले असूनही पक्षातील लोक, पक्षाशी संबंधित संस्था, संघटना व व्यक्तींची कामे होत नाहीत, अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आता मंत्र्यांना उत्तरदायी करण्यात आले आहे. भाजपचे सर्व मंत्री आणि प्रदेशाचे प्रमुख पदाधिकारी यांची एक बैठक बावनकुळे यांनी प्रदेश कार्यालयात काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यात भाजप व भाजपचे मंत्री यांनी एकमेकांना पूरक असे काम करण्यासंदर्भात कार्यक्रम निश्चित करण्यात आला. 

भाजपचे मंत्री एकेका जिल्ह्यात जातील. तेथे जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेतील, सरकार दरबारी असलेली कामे, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना याबाबत चर्चा करतील. याशिवाय ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी वन टू वन बोलतील. 

अंमलबजावणीचा आढावा घेणार भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे एक असा पीए नियुक्त करण्यात आला आहे, तो पक्षाच्या माध्यमातून (आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, संघ परिवारातील संघटना आदी) आलेल्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करेल. कोणत्या मंत्र्यांकडे कोण पीए नियुक्त केला आहे याची यादी प्रदेश भाजप कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात आली आहे.  पक्ष व परिवाराच्या माध्यमातून आलेल्या कामांची अंमलबजावणी कितपत झाली याचा आढावा बावनकुळे महिन्यातून एकदा घेणार आहेत.   

मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार   पक्षाच्या माध्यमातून आलेली कामे लगेच मार्गी लावण्यात भाजपचे जे मंत्री अग्रेसर आहेत त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सार्वजिनक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. मात्र, आता पक्षाच्या सर्वच मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड नियमितपणे तपासले जाणार असल्याची माहिती आहे.  भाजप-शिंदे गटाची समन्वय समिती नाही  - भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, संघ परिवारातील संस्थांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेली कामे  करवून घेताना अनंत अडचणी येतात. - हीच परिस्थिती शिंदे गटाचे आमदार, नेते यांची भाजपच्या मंत्र्यांबाबत आहे. भाजप-शिवसेना यांच्यात समन्वयासाठी साधी समितीदेखील नाही. महामंडळे व इतर समित्यांवरील नेमणुका निश्चित करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दोन्ही बाजूच्या चार मंत्र्यांच्या दोन बैठक झाल्या. पुढे काहीही झाले नाही.

टॅग्स :BJPभाजपाministerमंत्रीPoliticsराजकारण