दिवाळीनंतर काय ते उचकटेन - राज
By Admin | Updated: November 6, 2015 01:05 IST2015-11-06T01:05:46+5:302015-11-06T01:05:46+5:30
मी काय उचकटतो, याकडे तुमचे लक्ष लागले असेल. पण मी आज काही उचकटणार नाही. कल्याण-डोंबिवलीबाबत दिवाळीनंतर काय उचकटायचे ते उचकटेन, अशी टिपण्णी
दिवाळीनंतर काय ते उचकटेन - राज
पुणे : मी काय उचकटतो, याकडे तुमचे लक्ष लागले असेल. पण मी आज काही उचकटणार नाही. कल्याण-डोंबिवलीबाबत दिवाळीनंतर काय उचकटायचे ते उचकटेन, अशी टिपण्णी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना प्रतीक्षा करण्याचे संकेत दिले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निकालावर राज ठाकरे काय बोलतात, याकडे कार्यकर्त्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त परांजपे यांच्या निवासस्थानी सुसज्ज कला दालनाचे व चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन राज यांच्या हस्ते झाले. घरातच कलादालन सुरू करणारे परांजपे भारतातील पहिले कलाकार असतील. आमचे नाते गुरू-शिष्याचे आहे, त्यांच्याकडे मला शिकायला मिळाले म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे राज म्हणाले. (प्रतिनिधी)