शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकार असूनही शिवसैनिकांना काय मिळालं?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 08:32 IST

जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. 

मुंबई - जे आले त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. त्यांची बांधिलकी मतदारसंघाशी आहे. मतदारसंघात काम करायची असेल तर निधी हवा. मतदारांना सामोरं जायचं आहे. त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री आपला होता तरीही अपेक्षेप्रमाणे कामं झाली नाहीत. निवडणुकीत चौथ्या नंबरवर शिवसेना गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यात शिवसैनिकांना काय मिळाले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. 

आमदार संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या शिवसैनिक मेळाव्यात शिंदे बोलत होते. मध्यरात्री १ च्या सुमारास रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. अधिकार असताना, सरकार असताना आम्हाला शिवसैनिकांना मदत करता आली नाही. बाळासाहेब म्हणाले होते, सत्तेत असताना शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागता कामा नये. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. मी माझ्या पक्षाशी काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेबांनी सांगितले होते. तेच बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गुवाहाटीत बऱ्याच लोकांच्या कलागुणांना वाव देणारं प्लॅटफॉर्म झालं होतं. संजय सिरसाट यांचं सगळं ओके आहे. औरंगाबादहून प्रवास करून सगळे इथे आलेत. मध्यरात्री दीड वाजता कुणाचा असा मेळावा झाला नसेल. आम्ही ऐतिहासिक घटना केली आणि तुमचा ऐतिहासिक मेळावा आहे. ज्या घडामोडी झाल्या ऐतिहासिक होत्या. त्यांची नोंद फक्त राज्याने नव्हे, देशाने नव्हे तर जगातही घेतली गेली. रोज टीव्हीवर एकनाथ शिंदे आणि त्यांची ५० माणसं दिसत होती. रोज एक-एक वाढत होती. ५० झाल्यावर बोललो आता थांबवूया आणि मुंबईत वाढवूया. दबावाने माणसानं नेली असा आरोप झाला. परंतु त्याठिकाणी सगळे स्वइच्छेने आले होते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला योग्य वेळ असते. आम्ही प्रयत्न खूप केले. जे आम्ही केले ते २०१९ च्या निकालानंतर व्हायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. त्यावेळीही आमचे आमदार आपण चुकीच्या मार्गाने चाललोय असं सांगत होते. सहा महिन्यातच आपल्याला कळू लागलं. जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले त्यांना काय तोंड देणार? असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना