तीन तासांत जान्हवीने केले काय ?

By Admin | Updated: June 11, 2015 02:04 IST2015-06-11T02:04:42+5:302015-06-11T02:04:42+5:30

इस्टर्न फ्री वेवर आॅडी कारने टॅक्सीला धडक देऊन दोघांचे जीव घेणाऱ्या अ‍ॅड. जान्हवी गडकरने रात्री १० ते मध्यरात्री एक या वेळेत काय केले

What did Janni do in three hours? | तीन तासांत जान्हवीने केले काय ?

तीन तासांत जान्हवीने केले काय ?

मुंबई : इस्टर्न फ्री वेवर आॅडी कारने टॅक्सीला धडक देऊन दोघांचे जीव घेणाऱ्या अ‍ॅड. जान्हवी गडकरने रात्री १० ते मध्यरात्री एक या वेळेत काय केले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आरपीएफ पोलीस करीत आहेत. अ‍ॅड. जान्हवीच्या दाव्यानुसार ती या वेळेत मरिन ड्राइव्हवर गाडी पार्क करून गाणी ऐकत बसली होती. पण तिने या काळात आणखी दारू ढोसली किंवा अन्य अमली पदार्थांची नशा केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, जान्हवीच्या पोलीस कोठडीत १२ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
याबाबत आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप राऊत यांना विचारले असता, आरोपी तरुणीच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल मिळालेला नाही. अहवालातून आरोपी तरुणी किती दारू प्यायली होती, दारूव्यतिरिक्त आणखी कोणत्या अमली पदार्थाचे सेवन तिने केले होते का, याचा खुलासा होऊ शकेल, असे ते म्हणाले.
सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास जान्हवीने दारूच्या नशेत आपली आॅडी कार इस्टर्न फ्री वेवर विरुद्ध दिशेने वर चढवली. वाशीनाका परिसरातील बोगद्याच्या आधी तिने समोरून येणाऱ्या टॅक्सीला त्याच वेगात धडक दिली. त्यात टॅक्सीचालक हुसेन सय्यद आणि पुढे बसलेले सलीम साबूवाला जागीच ठार झाले. तर साबूवाला यांच्या पत्नी व दोन मुली गंभीररीत्या जखमी झाल्या, तर मुलगा नोमान जखमी झाला.
जान्हवी सातच्या सुमारास हॉटेलमध्ये गेली. तिथे तिने मद्यपान केले. १० वाजता हॉटेलबाहेर पडली, मात्र तिच्या गाडीने झालेला अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. त्यामुळे मधल्या तीन तासांत काय केले, याबाबत पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली.फ्री वेवर विरुद्ध दिशेने कशी शिरली, हेही तिला आठवत नव्हते. मधल्या काळात तिने आणखी नशा केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: What did Janni do in three hours?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.