शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

Baramati: ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही...’;अजितदादांचा चढला पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 12:31 IST

Ajit Pawar Baramati visit:अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली.

ठळक मुद्देअजित पवारांनी पूर्ण केली 'त्या' चहावाल्याची इच्छा

बारामती: राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही अजित पवार रोखठोक शैलीत बोलताना दिसले आहे. मग कार्यकर्त्यांना समजुन सांगणे असो किंवा त्यांना रागात बोलणे असो...अजित पवार आपल्या बोलण्याची पद्धत कायम ठेवतात. अशीच एक घटना आज बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात घडली. यावेळी अजित पवारांचा पारा चढलेला पाहायला मिळाला.

काल पुण्याचा दौरा आटोपून अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात सर्वसामान्य बारामतीकर आपापली कामं घेऊन अजित पवारांकडे आली होती. सकाळी बारामतीमधील देसाई इस्टेटमध्ये कार्यक्रम सुरु असताना एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजित पवारांकडे आला. 'माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत, ते मिळवून देण्यासाठी मदत करा', अशी विनंती त्या व्यक्तीने केली. यानंतर पवारांचा पारा चढला. ‘बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल. पण, चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही’, अशा शब्दात अजित पवारांनी त्या व्यक्तीला सुनावलं.

अजित पवारांनी पूर्ण केली चहावाल्याची इच्छाअजित पवार आज बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून जात आसताना एका कार्यकर्त्याने अजित पवारांकडे इच्छा व्यक्त केली, तसा आग्रहही धरला. दादा, मी फिरत्या वाहनावर टी स्टॉल चालू केले आहे, याचे उद्घाटन आपण करावे ही इच्छा या कार्यकर्त्याने बोलून दाखवली. त्यावेळी, उपमुख्यमंत्र्यांनी फीत कापून कसदार चहा स्टॉलचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवारांनी, तुझ्या चहाची क्वॉलिटी आहे का ? असे विचारून स्वतः चहाचा आस्वादही घेतला. खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते आपल्या गुळाच्या चहाच्या स्टॉलचे उद्घाटन झाल्याने या कार्यकर्त्याचा आनंद गगनात मावेना झाला होता. 

 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे