शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

कशातून येतो मराठी शाळांच्या गळचेपीचा उद्दामपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:50 IST

मराठी शाळांचे प्रश्न काय आहेत? याची मांडणी करण्याकरता शासनाने एक अभ्यासगट नेमावा, ही मागणी गेली दहा वर्षे आम्ही करतो आहोत; पण जखमांची मलमपट्टी करण्यात रस नसणारे शासन आहे.

डॉ. वीणा सानेकरमराठी शाळांचे प्रश्न काय आहेत? याची मांडणी करण्याकरता शासनाने एक अभ्यासगट नेमावा, ही मागणी गेली दहा वर्षे आम्ही करतो आहोत; पण जखमांची मलमपट्टी करण्यात रस नसणारे शासन आहे. मराठी शाळांना काहीही प्रश्न नाहीत, असे म्हणत कॉर्पोरेट कंपन्यांना मराठी शाळा चालवायला देण्याच्या वल्गनांमध्येच सत्तेचा क्रूर खेळ सुरू आहे. दहा पटसंख्येपेक्षा कमी संख्या असणाºया शाळा बंद करा, अशी नोटीस जारी होतानाच बृहद् आराखड्याअंतर्गत कधी तरी मान्यता मिळेल म्हणून दहा-दहा वर्षे सारे काही पणाला लावून शाळा चालवणाºयांच्या तोंडावर जी.आर. फेकला जातो नि क्षणात बृहद् आराखडा रद्द होतो. कशातून येतो आहे हा उद्दामपणा?कार्यकर्ती म्हणून गेली दहा वर्षे मी मराठीसाठी काम करते आहे. मराठी अभ्यास केंद्र ही आमची संस्था तळमळीच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली. मराठीच्या प्रश्नांवर अभ्यास नि त्यातून उभे राहिलेले काम हे संस्थेचे वैशिष्ट्य. मंत्रालयातला भाषा विभाग अस्तित्वात येणे ही केंद्राच्या कामाचीच पावती होय. हा भाषा विभाग कसा असावा, याचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव केंद्राने तयार केला. तो सरकारदरबारी पडून आहे. बृहद् आराखड्याअंतर्गत मराठी शाळांना मान्यता मिळावी म्हणून केंद्राने आवाज उठवला. हा आवाज मराठी शाळांकरता झटणाºया सामान्य माणसांचा आवाज होता. कधी शाळांकरता निर्धार बैठका घे तर कधी पालक संमेलनाच्या माध्यमातून ‘मराठी माध्यमच का हे सांग’, कधी बॅचलर आॅफ मास मीडियाचा अभ्यासक्रम मराठीत यावा म्हणून पाठपुरावा कर तर कधी महाविद्यालयांतून वाङ्मय मंडळे असलीच पाहिजेत हे विद्यीपीठांतून पटवून दे. कधी भारतीय भाषांच्या स्थितीची सर्वेक्षण मोहीम आख, असे विविध प्रकारे काम करत राहिलो. काय भाषेची रडगाणी गाता म्हणून हिणवणारे बरेच भेटले. वाङ्मय मंडळांचे मेळावे भरवले तेव्हा त्यात काहीही रस नसणारे मराठीचे प्राध्यापकच जास्त होते. काळानुरूप मराठीच्या अभ्यासक्रमात बदल व्हावेत हा मुद्दा लावून धरला. पण समीक्षाकेंद्री चौकटी सोडून मराठीचा नवा विचार करण्याची दृष्टी स्वीकारायला तयार असणारे लोक कमीच निघाले. भाषेचे प्रश्न कळतील असे अभ्यासक, तज्ज्ञ, हाडाचे कार्यकर्ते आहेत, पण व्यवस्था त्यांना व्यर्थच कामांमध्ये गुंतवते आहे, जाणूनबुजून त्यांचे काम खोडून काढते. कधी त्यांची खिल्ली उडवते आहे तर कधी भाषेच्या बाबतीत सर्व आलबेल असल्याचे फसवे चित्र उभे करते आहे. (लेखिका या मराठी अभ्यास केंद्राच्या शाळा कृती गटाच्या प्रमुख आहेत.)मराठी शाळांना काहीही प्रश्न नाहीत, असे सोयीस्कररीत्या धरून चालल्यावर जखम कितीही चिघळली तरी काय फरक पडतो? मग आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी शाळा उभ्या करू, कॉर्पोरेट कंपन्यांना मराठी शाळा चालवायला देऊ असल्या वल्गना सुरू होतात. पण भरपूर पटसंख्या असणाºया शाळा मात्र मान्यतेविना वर्षानुवर्षे रखडत आहेत.

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018Schoolशाळा