खासगी दूध संकलकांवर काय बंधने घालणार ?
By Admin | Updated: July 23, 2015 01:43 IST2015-07-23T01:43:45+5:302015-07-23T01:43:45+5:30
सहकारी दूध संस्थांनी २० रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे

खासगी दूध संकलकांवर काय बंधने घालणार ?
मुंबई : सहकारी दूध संस्थांनी २० रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले.
सहकारी क्षेत्रापेक्षा खासगी दूध संकलकांकडून अधिक दूध संकलित होते. त्यांच्यावर दुधाच्या दराबाबत सरकार कोणते बंधन घालणार, असा सवाल सभापती रामराजे निंबाळकर यांनी खडसे यांना केला. त्यावर या दृष्टीने नक्की विचार करू, असे खडसे म्हणाले. जयवंतराव जाधव यांनी नियम ९३ अन्वये चर्चेची सूचना दिली होती. त्यावर खडसे म्हणाले की, २० रुपयांपेक्षा कमी दराने दूध संकलन करणाऱ्या संस्थांना सरकारने नोटीस दिल्या असून, याबाबत वारंवार तक्रारी आल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दर घसरले आहेत. केंद्र सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीकरिता मदत करावी, अशी
विनंती केली आहे. खडसे यांच्या या उत्तरानंतर खासगी दूध संकलकांवर कोणती बंधने घालणार, असा सवाल सभापतींनी केला. (विशेष प्रतिनिधी)