शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कसबे तडवळे येथील ‘त्या’ स्मारकांबाबत काय कारवाई केली? खंडपीठाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 10:05 IST

Court: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील क्रांती स्तंभ,  वाचनालय व राष्ट्रीय स्मारक उभारणीसंदर्भात कोणती पावले उचलली,

औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील क्रांती स्तंभ,  वाचनालय व राष्ट्रीय स्मारक उभारणीसंदर्भात कोणती पावले उचलली, याबाबत पुढील सुनावणीवेळी माहिती सादर करण्याचा आदेश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी राज्याच्या समाजकल्याण विभागाला दिला. स्मारके उभारण्याचा निर्णय ७ वर्षांपूर्वी घेण्यात आला असल्यामुळे कारवाईसाठी कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. कसबे तडवळा येथील बोधिसत्त्व डॉ. भीमराव आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश यशवंत सोनवणे यांनी ॲड. रामराव बिरादार कवठाळकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटल्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ आणि २३ फेब्रुवारी १९४१ ला  कसबे तडवळे येथे महार मांग परिषद घेतली होती. 

ते  डाक बंगल्यात मुक्कामी राहिले होते. त्यांची आठवण म्हणून डॉ. बाबासाहेब राहिलेल्या जागी  क्रांती स्तंभ, वाचनालय व इतर राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी २०१२ पासून २०१९ दरम्यान याचिकाकर्त्याने शासन स्तरावर वेगवेगळी निवेदने सादर केली.  त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने  २०१५ साली त्या ऐतिहासिक जागेला पर्यटनस्थळ म्हणून मान्यता तसेच २३ मार्च २०१६  रोजी २ कोटी ३२ लाख रु.  मंजूर केले. 

तसेच २ जुलै २०१८ ला शासन निर्णय जारी करून  ८५ लाख ३१ हजार २२३ रुपये क्रांती स्तंभ व वाचन कक्षासाठी मंजूर केले होते.  परंतु त्यानंतर कुठलीच कार्यवाही न झाल्याने याचिकाकर्त्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी  जनहित याचिका  दाखल केली. 

माहिती सादर करण्याचा आदेश याचिका १८ जानेवारी २०२३ रोजी  सुनावणीस निघाली असता, खंडपीठाने  शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना राष्ट्रीय स्मारक तसेच क्रांती स्तंभ व वाचनालय उभारण्यासाठी काय कारवाई केली, यासंदर्भाने  ३ फेब्रुवारी रोजी माहिती सादर करण्याचा आदेश दिला. शासनातर्फे सहायक सरकारी वकील व्ही. एम. कागणे काम पाहत आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र