...मग खासदार हेमंत गोडसेंचे काय?
By Admin | Updated: December 25, 2014 02:01 IST2014-12-25T02:01:38+5:302014-12-25T02:01:38+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्यावरून राज्यसभेत गोेंधळ उडाल्यावरून ‘गोडसे’ हा शब्द राज्यसभेत

...मग खासदार हेमंत गोडसेंचे काय?
नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्यावरून राज्यसभेत गोेंधळ उडाल्यावरून ‘गोडसे’ हा शब्द राज्यसभेत असंसदीय ठरविण्याच्या मुद्द्यावरून गोेंधळ उडाला असून, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी गोडसे शब्दाला असंसदीय ठरविण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरीयन यांच्याकडे तक्रार केली आहे.
नथुराम गोडसे यांच्यावरून राज्यसभेत व लोकसभेत गोंधळ उडाल्यानंतर राज्यसभेत गोडसे हा शब्द असंसदीय ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयावर खासदार हेमंत गोडसे यांनी आक्षेप घेतला आहे. एखाद्या व्यक्तीवरून जर एखादा शब्द असंसदीय ठरणार असेल तर त्या व्यक्तीच्या आडनावाचे अन्य काही लोक व कुटुंब असतील तर हा त्यांच्यावर अन्याय आहे. कोणाचे वैयक्तिक नाव असेल तर ते कसे असंसदीय ठरू शकेल, त्यामुळे गोडसे हा शब्द असंसदीय ठरविण्याचा निर्णय अशा नावाच्या कुटुंबावर अन्याय करणारा असून, त्याबाबत तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी, या मागणीचा ई-मेल खासदार हेमंत गोडसे यांनी राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरीयन यांना पाठविला आहे. तसेच प्रिव्हीलेज समितीचे सहसचिव श्री. पांडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, त्यांनी हा निर्णय वगळण्याचे आश्वासन आपल्याला दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)