ओल्या कचऱ्यापासून होणार बायोगॅसनिर्मिती
By Admin | Updated: August 4, 2015 02:02 IST2015-08-04T01:19:48+5:302015-08-04T02:02:08+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांत घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर असून घनकचरा प्रकल्पाला विशेष प्राधान्य देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त ई. रवींद्रन

ओल्या कचऱ्यापासून होणार बायोगॅसनिर्मिती
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर असून घनकचरा प्रकल्पाला विशेष प्राधान्य देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा मनोदयही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
बायोगॅस प्रकल्पासाठी काही जागा निश्चित केल्या असून शहरातील हॉटेल, भाजी मार्केट, तबेले येथील कचराही एकत्र करून त्यापासून बायोगॅस तयार केला जाणार आहे. त्यापासून वीजनिर्मिती केली जाणार असून येत्या सहा महिन्यांत याची अंमलबजावणी दिसून येईल, असा दावा त्यांनी केला.
स्थानिक संस्था कर बंद झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर होणारा परिणाम पाहता मालमत्ता कर आणि पाणीबिले वसुलीला विशेष प्राधान्य दिले जाईल. स्थानिक संस्था कराच्या बदल्यात शासन अनुदान देणार असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले.
ठाकुर्लीतील दुर्घटना पाहता नागरिकांनी धोकादायक आणि अनधिकृत इमारतींत घरे घेऊ नका, असे आवाहन करताना निर्माण होणाऱ्या वादावर इमारतींचे मालक आणि भाडेकरू यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न राहील. रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रसंगी भाडेतत्त्वावर मालमत्ता घेऊ, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)