पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने

By Admin | Updated: August 30, 2016 10:12 IST2016-08-30T10:12:20+5:302016-08-30T10:12:48+5:30

रेगाव रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे.

Western Railway transport delayed by half an hour | पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने

पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - गोरेगाव रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक १५ मिनिटं उशिराने तर, धीम्या मार्गावर अर्धातास उशिराने वाहतूक सुरु आहे. 
 
कार्यालय गाठण्याच्यावेळेत हा बिघाड झाल्याने लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत. उपनगरीय लोकल सेवा ऐन गर्दीच्यावेळी विस्कळीत होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेकदा उपनगरीय लोकल सेवा मोक्याच्या वेळेला विस्कळीत झाली आहे. 
 

Web Title: Western Railway transport delayed by half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.