पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

By Admin | Updated: May 31, 2016 16:15 IST2016-05-31T16:15:12+5:302016-05-31T16:15:12+5:30

डबा रुळावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र तरीही वाहतूक काहीशी धीम्या गतीनेच सुरू होती

Western Railway Traffic Prerequisites | पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31- लोअर परळ येथील यार्डात जाणारा एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. डबा रुळावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र तरीही वाहतूक काहीशी धीम्या गतीनेच सुरू होती. मात्र आता वाहतूक पूर्णतः पूर्वपदावर आल्याची माहिती रेल्वे व्यवस्थापनानं दिली आहे.
लोअर परळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ एक्स्प्रेसचा पहिलाच डबा रुळावरुन घसरला होता. त्यामुळे लोअर परळच्या फलाट क्रमांक १ आणि २ फलाटांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. पश्चिम रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी क्रेनच्या सहाय्याने डब्बा हटवला. मात्र वाहतूक काहीशी उशिरानं सुरू होती. आता मात्र वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Western Railway Traffic Prerequisites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.