ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे ठप्प
By Admin | Updated: December 24, 2014 10:06 IST2014-12-24T09:54:58+5:302014-12-24T10:06:26+5:30
अंधेरीजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे ठप्प
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अंधेरीजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सकाळी ९.३०च्या सुमारास ही घटना घडली असून त्यामुळे अप व डाऊन मार्गावरील वाहतुकीला याचा फटका बसला आणि लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिघाड दुरूस्तीचे काम सुरू आहे, मात्र त्यास नेमका किती वेळ लागेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सकाळी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस लोकल वाहतुकीचा खोळंबा झाल्याने कामावर निघालेल्या मुंबईकरांना मनस्ताप नाहक सहन करावा लागत आहे.