पश्चिम रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 19:05 IST2016-08-12T18:35:37+5:302016-08-12T19:05:56+5:30

मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झाली

Western Railway detention, passenger trains | पश्चिम रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे अतोनात हाल

पश्चिम रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे अतोनात हाल

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्टेशनवर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं धिम्या मार्गावरील गाड्या उशिरानं धावत आहेत. विरारकडे जाणा-या धिम्या मार्गावरील गाड्यांचा खोळंबा झाला आहे. तर चर्चगेटकडे येणा-या जलद लोकलही उशिरानं धावत आहेत. ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळेत पश्चिम रेल्वे खोळंबल्यानं प्रवाशांनी त्रासाला सामोर जावं लागतं आहे. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अनेक प्रवासी ट्रेनंची आतुरतेनं वाट पाहताना दिसता आहेत. रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्मवर तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल उशिरानं धावत असल्याची उद्घघोषणाही करण्यात येते आहे.

Web Title: Western Railway detention, passenger trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.