पश्चिम, मध्य रेल्वेला बिघाडाचा फटका
By Admin | Updated: August 27, 2014 14:23 IST2014-08-27T04:25:30+5:302014-08-27T14:23:10+5:30
पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गावर मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी झालेल्या बिघाडामुळे कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्यांचे हाल झाले.

पश्चिम, मध्य रेल्वेला बिघाडाचा फटका
मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गावर मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी झालेल्या बिघाडामुळे कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्यांचे हाल झाले.
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास माहीम ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर विरारहून सुटलेल्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लोकल जागेवरच थांबली. त्यामुळे मागून येणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला. पंधरा मिनिटांत हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. ही घटना घडलेली असतानाच रात्री ७.४0 वाजण्याच्या सुमारास विद्याविहार स्थानकाजवळ डाऊन जलद मार्गावर ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवल्या.
दहा मिनिटांत ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर जलद लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. (प्रतिनिधी)