अरेच्छा...! अनंत अंबानीनं 18 महिन्यांत घटवलं 108 किलो वजन
By Admin | Updated: April 10, 2016 23:02 IST2016-04-10T16:57:27+5:302016-04-10T23:02:33+5:30
अतिलठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या अनंत अंबानीनं चक्क 18 महिन्यांत 108 किलो वजन घटवलं आहे.

अरेच्छा...! अनंत अंबानीनं 18 महिन्यांत घटवलं 108 किलो वजन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १०- उद्योग विश्वात मुकेश अंबानीचं नाव खूप मोठं आहे. त्यांचाच पुत्र अनंत अंबानी गेल्या अनेक दिवसांपासून अतिलठ्ठपणामुळे त्रस्त होता. काल रात्री प्रसिद्धी केलेल्या एका फोटोमुळे अनंत अंबानीनं अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. अतिलठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या अनंत अंबानीनं चक्क 18 महिन्यांत 108 किलो वजन घटवलं आहे.
मुकेश अंबानी आणि निता अंबानींचा पुत्र अनंत अंबानी गेल्या दीड वर्षापासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील होता. डॉक्टरांनी त्याला औषधं घेण्याचाही सल्लाही दिला होता. मात्र त्यानं औषधांचा आधार न घेता अथक परिश्रम आणि व्यायाम करून स्वतःची 108 किलो चरबी घटवली आहे. आणि हा चमत्कार अनंतनं फक्त 18 महिन्यांत करून दाखवला आहे. दररोज 5 ते 6 तास व्यायाम करून डायट केल्यानं त्याला ही चरबी कमी करणं शक्य झालं आहे.
तो प्रत्येक दिवशी नियमानुसार 21 किलोमीटर चालत असे. योगा, वेट ट्रेनर, कार्डिओचा व्यायामही करत होता. दररोज अनंत झीरो शुगर, कमी कर्बोदकांनी युक्त पदार्थ खात होता. निता अंबानीही मुलानं वजन कमी केल्यानं फारच आनंदित झाल्या आहेत. खूप कष्ट करून 500 दिवस स्वतःचा घाम गाळून अनंतनं हे वजन घटवलं आहे. त्यानं शरीराची संपत्ती कमावल्याचंही यावेळी निता अंबानींनी म्हटलं आहे. अनंतनं आयुष्याची मोलाची लढाई जिंकून लोकांसाठी आदर्श निर्माण केला असल्याचंही यावेळी निता अंबानींनी सांगितलं आहे.
/////////