शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:45 IST

आमदार संजय केळकर यांच्या मागणीची दखल

सांगली : वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत घटक असून, अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत. त्याचीही घोषणा लवकरच करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी याबाबतची मागणी केली होती, अशी माहिती राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे, माजी राज्य कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर, सरचिटणीस विशाल रासनकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी दिली.कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रिफ, संभाजी पाटील-निलंगेकर, दिलीप वळसे-पाटील व विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे संघटनेने अनेकदा पाठपुरावा केला. संभाजीराव पाटील निलंगेकर कामगार मंत्री असताना, त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली. या समितीने अहवालही सादर केला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे, अशी शिफारस केली होती. मात्र त्यानंतर चार वर्षे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा संजय केळकर यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. केळकर यांनी नुकतीच अधिवेशनातही कल्याणकारी मंडळाची मागणी केली. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ केल्यानंतर या घटकालाही न्याय द्यावा, असा आग्रह धरला.मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केळकर यांच्या मागणीबाबत सांगितले की, वृत्तपत्र विक्रेत्यांनाही न्याय देऊ, त्यांच्या कल्याणकारी मंडळाचीही घोषणा लवकरच करू.

अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणारआम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे पाठपुरावा करत आहोत. संजय केळकर यांनी यावेळीही मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्वासन दिले. ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे. केळकर यांच्या माध्यमातून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. लवकरात लवकर मंडळाची घोषणा व्हावी व अंमलबजावणी सुरू व्हावी, अशी मागणी करू, असे राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी व कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदे