सोपानकाका पालखीचे माळेगावात स्वागत

By Admin | Updated: June 29, 2014 22:35 IST2014-06-29T22:35:39+5:302014-06-29T22:35:39+5:30

माळेगाव (ता. बारामती) येथे संत सोपानकाका पालखी सोहळयाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

Welcome to Sopachankar Palkhi | सोपानकाका पालखीचे माळेगावात स्वागत

सोपानकाका पालखीचे माळेगावात स्वागत

>माळेगाव : माळेगाव (ता. बारामती) येथे संत सोपानकाका पालखी सोहळयाचे उत्साहात  स्वागत  करण्यात आले. यावेळी रविवारी (दि.29)माळेगाव येथे अश्वरिंगणाची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली . दुपारी दोन वाजता सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा माळेगावात विसावला. पालखीचे स्वागत सरपंच सविता बुरूंगुले,उपसरपंच सचिन तावरे यांनी केले.माळेगावमध्ये सुरू असणारी रिंगण सोहळ्याची परंपरा खंडीत झाली होती. ती परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.रविवारी रिेंगण सोहळा उत्साहात पार पडला. सुरूवातीला विणोकरी,टाळकरी,यांचे रिंगण पार पडले.त्यानंतर झालेल्या अश्वरिंगणाने भाविकांच्या डोळ्याचे पारणो फे डले.भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. त्यानंतर पालखी हनुमान मंदिरात विसावली.

Web Title: Welcome to Sopachankar Palkhi